पावसाचा कहर | रस्ते पाण्याखाली गेल्याचे भयंकर फोटो समोर

गोव्याच्या शेजारील राज्यांना पावसाचा मोठा तडाखा, राज्यातही पावसाचा अंदाज

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

तेलंगणा : मुसळधार पावासने तेलंगणाला झोडपून काढलंय. तेलंगणातील जनजीवनावर पावसाचा मोठा परिणाम झालाय. गेल्या काही तासांत तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पावसाचा जोर कमालीचा वाढलाय. यामुळे या सर्वच राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

तेलंगणामध्ये पावासने कहर केला असून मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालाय. रस्तेच पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक रस्त्यांवर दोन ते तीन फूटांपर्यंत पाणी साचलंय. काही गाड्यासुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत. गेल्या काही तासांत झालेल्या विक्रमी पावसामुळे सामान्यांचे मोठे हाल झालेत. दरम्यान, पावसाचा जोर दिवसभर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाहा फोटो –

राज्याचा शेजारी कर्नाटकातही धुमाकूळ

शेजारील राज्य कर्नाटकामध्येही पावसाचा जोर प्रचंड आहे. सकाळपासूनच कर्नाटकला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार कर्नाटकच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कर्नाटकच्या मंगळुरुमध्ये तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच लोकांनी गाड्या हाकल्यात.

हैदराबादलाही तडाखा

तेलंगणा, कर्नाटक पाठोपाठ हैदराबादमध्ये जोरदार पाऊस झालाय. अचानक झालेल्या पावसाने हैदराबादमधील लोकांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसाने हैदराबादमधील रस्तेही जलमय झालेत. रस्त्यावर साचलेलं पाणी अनेक दुकानांत शिरल्यानं दुकानांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. एकूण जोरदार पावसानं हैदराबादमधील जनजीवनही विस्कळीत झालंय.

पाहा व्हिडीओ

आंध्रप्रदेशमध्येही पावसाचा जोर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!