समीर वानखेडेंचा ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्काराने गौरव

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ४२ मान्यवरांना ‘मेड इन इंडिया आयकन्स : महाराष्ट्र सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मुंबईतील राजभवन येथे पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात मुंबई आणि गोवाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेच्या वतीने देण्यात आले.

हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांचा गौरव

या पुरस्कार सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक गायक तसंच कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक कुमार शानू, उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलीया यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते प्रशांत दामले, भरत जाधव व स्वप्नील जोशी यांना देखील महाराष्ट्र सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.

नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेचे अध्यक्ष संदीप घुगे व्यासपीठावर उपस्थित होते.

हा व्हिडिओ पहाः Video | SWAMI | पर्तगाळ मठाच्या आवारात विधीवत पार्थिव समाधीस्थ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!