संकट काळात मोदी सरकारचा मोठा निर्णय

जूनपर्यंत मिळणार मोफत अन्नधान्य; गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना आणखी दोन महिने सुरू ठेवणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मार्च 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आता आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. जेणेकरुन कोरोनाच्या या संकट काळात गरीब आणि वंचित लाभार्थ्यांना अन्नधान्याची कमतरता भासू नये.

हेही वाचाः जीएमसीत ओपीडीसाठी आता फोनवर घेता येणार अपॉइंटमेंट?

गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना आणखी दोन महिने सुरू ठेवणार

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. अशा या संकटाच्या परिस्थितीत गरीबांना झळ बसू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र सरकार 26,000 कोटींहून अधिक रुपये खर्च करणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना पाच किलो गहू आणि तांदुळासह एक किलो चणे देण्यात येत आहेत.

हेही वाचाः ALPHANSO | ओरिजनल हापूस कसा ओळखणार? कोकणातील बागायतदारांचा मॉडर्न फंडा

योजना पुन्हा राबवण्याची केली होती मागणी

काही दिवसांपूर्वीच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसाठी योजना पुन्हा राबवण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!