ऑनलाईन कंटेंटवर यापुढे सरकारची नजर, बातम्या देण्याऱ्या वेबसाईटबाबतही महत्त्वाचा निर्णय

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात डिजीटल कंटेटची (Digital Online Content) मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीप्रमाणेच त्यांचा पुरवठा करणाऱ्या ऑनलाईन वेबसाईट्सही वाढल्यात. बातम्या देणाऱ्या वेबसाईट्स, न्यूज पोर्टल यांची गेल्या काही काळात लक्षणीत प्रमाणात वाढ झाली आहे. या सगळ्या बातम्या (News Websites) देणाऱ्या वेबसाईट आणि न्यूज पोर्टल्स आता माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित येणार आहेत.
करडी नजर
ऑनलाईन मीडिया, वेबसाईट्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश यात करण्यात आला आहे. त्यामुळे आता भविष्यात ऑनलाईन माध्यमांवर केंद्र सरकारची करडी नजर असणार आहे. केंद्र सरकारनं तसे आदेश जारी केलेत.
कुणावर सरकारचा वॉच?
सरकारच्या या नव्या निर्देशांमुळे देशातील ऑनलाइन सिनेमे, ऑडिओ व्हिज्युएल कार्यक्रम आणि बातम्या, तसंच कंटेपरी कंटेट पुरवणाऱ्या ऑनलाइन डिजीटल मीडियावर केंद्र सरकारचा अंकुश राहील, असं बोललं जातंय. इतकंच नाही, तर यापुढे नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझान प्राइम (Amazon Prime), हॉटस्टारसारख्या (Hotstar) ओटीटी (OTT) फ्लॅटफॉर्मच्या कंटेटवरसुद्धा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नजर असणार आहे.
काय आहे हा निर्णय?
Government issues order bringing online films and audio-visual programmes, and online news and current affairs content under the Ministry of Information and Broadcasting. pic.twitter.com/MoJAjW8fUH
— ANI (@ANI) November 11, 2020
हेही वाचा –
भाज्यांवर मिळणारे कमिशन कोणाच्या घशात?
गोव्याचं ‘फुफ्फुस’ जपायला हवं : जयराम रमेश