‘अर्णबने रेटिंग फिक्स करण्यासाठी 12 हजार डॉलर आणि 40 लाख दिले’

इंडियन एक्स्प्रेच्या वृत्ताचा खळबळजनक दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढण्याची शक्यताय. मुंबई टीआरपी घोटाळ्याप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल म्हणजेच बार्क इंडियाचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनात असा दावा केला आहे की अर्णब गोस्वामी यांनी त्यांना दोन कौटुंबिक सहलीसाठी 12 हजार अमेरिकी डॉलर (सुमारे 8,75,910 रुपये) दिले होते. सप्लीमेन्ट्री चार्जशीटनुसार, दासगुप्ताने असंही म्हटलंय की न्यूज चॅनेलच्या बाजूने रेटिंग देताना अर्णब यांनी तीन वर्षांत एकूण 40 लाख रुपये दिलेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय. (goswami-paid-me-12000-and-rs-40-lakh-to-fix-ratings)

मुंबई पोलिसांनी 11 जानेवारीला 3600 पानी चार्जशीट दाखल केली होती. यात बार्कचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट, दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील व्हाट्सएप चॅट आणि माजी कौन्सिल स्टाफ, तसंच केबल ऑपरेटर्स इत्यादींचे जबाब नोंदवण्यात आलेत. आणि आता यप्रकरणी आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आलाय.

टीआरपी घोटाळा

27 डिसेंबर रोजी दासगुप्ता यांचं निवेदन नोंदविण्यात आलं होतं. बार्कचे माजी सीईओ रोमिल रामगडिया आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दासगुप्ता यांनी दाखल केलंय. नोव्हेंबर 2020मध्ये 12 जणांविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होते. दुसर्‍या आरोपपत्रानुसार, दासगुप्ता यांचे निवेदन 27 डिसेंबर 2020 रोजी क्राइम इंटेलिजेंस युनिट कार्यालयात संध्याकाळी 5 वाजता 2 साक्षीदारांच्या उपस्थितीत नोंदविण्यात आलं होतं.

‘रेटिंग फिक्सच्या बदल्यात अर्णबने मदतीचे वचन दिले’

दासगुप्ता यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,

‘मी 2004 पासून अर्नब गोस्वामी यांना ओळखतो. आम्ही टाईम्स नाऊमध्ये एकत्र काम करायचो. मी २००४मध्ये बार्कचा सीईओ म्हणून रुजू झालो. अर्णब गोस्वामी यांनी 2017 मध्ये रिपब्लिक लॉन्च केलं होतं. रिपब्लिक टीव्ही लाँच होण्यापूर्वीच, त्यांनी मला लाँचिंगबद्दल सांगितलेलं. तसंच अप्रत्यक्षपणे त्यांनी चॅनेलला चांगले रेटिंग देण्यास मदत मागितली होती. टीआरपी यंत्रणा कशी काम करते हे मला ठाऊक असल्याचं हे गोस्वामींना माहीत होतं.

रिपब्लिक टीव्हीला पहिल्या नंबरचं रेटिंग मिळवून देणासाठी आणि टीआरपी रेटिंगची हेरफेर सुनिश्चित करण्यासाठी मी माझ्या टीमबरोबर काम केलं हा सगळा प्रकार 2017 ते 2019पर्यंत चालला. अर्णबने दोन कौटुंबिक सहलीसाठी 1200 डॉलर्स दिल्याचं पार्थ दासगुप्त यांनी म्हटलंय. . हा क्रम 2017 ते 2019 पर्यंत चालू राहिला. 2017मध्ये, अर्नबने लोअर परळच्या सेंट रेगिस हॉटेलमध्ये माझी भेट घेतली आणि फॅमिली टूर ऑफर केली. फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सहलीसाठी 6000 डॉलर दिले. त्यानंतर 2019 मध्ये, अर्नब मला सेंट रेगिस इथं वैयक्तिकरित्या भेटला आणि मला स्वीडन आणि डेन्मार्कच्या फॅमिली ट्रीपसाठी पुन्हा 6000 डॉलर दिले.

दासगुप्ता यांच्या वकिलांनी विधान नाकारले

दासगुप्ता म्हणाले, ‘2017 मध्ये अर्णबने मला आयटीसी परळ होल येथे भेटले आणि 20 लाख रुपये रोख दिले. 2018 आणि 2019 मध्ये, गोस्वामी मला हॉटेल आयटीसी परळ येथे भेटले आणि 10-10 लाख रुपये दिले.

दासगुप्ता यांच्या वक्तव्यावर त्यांचे वकील अर्जुन सिंह यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस‘शी बोलताना म्हटलंय की ‘आम्ही हे विधान पूर्णपणे नाकारले आहे कारण ते दबावखाली नोंदवले गेले असावे. न्यायालयात याची कोणतीही विश्वासार्हता नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!