हीच खरी पॉझिटिव्ह बातमी! अहो, पगारवाढ मिळतेय, आपली कधी?

दादा गुडन्यूज आहे! आयटी, फार्मा कंपन्यांचे व्यवसाय तेजीत, अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना संजीवनी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरोः करोनाचा फटका बसलेल्या 2 गोष्टी कुठल्या असं विचारलं तर साहजिकच आरोग्य आणि पैसा असंच उत्तर येईल. करोनानं जसं आरोग्य धोक्यात आलं तसंच नोकरी-धंदे बुडवले. काहीजणांच्या नोकऱ्या कशाबशा वाचल्या असल्या काहीजणांना पगारकपातीला सामोरं जावं लागलं. अनेकजण तर निम्म्याहून कमी पगारावर सध्या भागवत आहेत. आता देशात करोनाचा जोर उतरत असतानाच एक दिलासादायक बातमी पुढे आलीय. आपला विश्वास बसत नसला तरी अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची पगारकपात मागं घेण्याचा निर्णय घेतलाय. इतकंच नव्हे तर त्यांना पगारवाढही जाहीर होणारेय.

पगारवाढीसह बोनसही…

केंद्र सरकारनं नुकताच सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला होता. राज्य सरकारं याची री कधी ओढतील असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला होता. अनलॉकच्या प्रक्रियेमुळं अर्थव्यवस्था हळूहळू मोकळा श्वास घ्यायला लागलीय. खासगी क्षेत्रातील कंपन्याही पूर्वपदावर येऊ लागल्यात. या पार्श्वभूमीवर आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची पगारकपात मागं घेण्यात येत असल्याचं जाहीर केलंय. इतकंच नव्हे तर त्यांना बोनस आणि पगारवाढ देण्याचाही विचार चालवलाय. यात टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, माईंड ट्री अशा आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असून, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पगारवाढ जाहीर केलीय.

30 टक्के अॅडव्हान्स देण्याचा विचार

सध्या देशात आघाडीवर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तर दसऱ्यापूर्वीच दिवाळी आलीय. या इंडस्ट्रीजमधील काही विभागात पगार पूर्ववत झालेत. शिवाय, चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा करण्यात आलीय. रिलायन्सनं एक पाऊल पुढं जात ३० टक्के अॅडव्हान्सचा विचार चालवलाय. फार्मा कंपन्यांकडूनही अशाच प्रकारचं बोनस दिलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

आपली कधी?

अनलॉकमुळं अनेकांचे संसार पूर्वपदावर आलेत. तसंच, अनेक छोट्या मोठ्या उद्योगांतही आर्थिक आवक पूर्वीप्रमाणं येऊ लागलीय़. या पार्श्वभूमीवर आपली पगारवाढ कधी, असा प्रश्न सामान्य कर्मचाऱ्यांना पडला नसेल तर नवल…

हेही वाचा

का गायब होताहेत फ्रान्सचे प्रॉडक्ट्स? जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचाच…

बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज

भाजपच्या फेक न्यूजना फेसबुकवर मोकळं रान!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!