चांगली बातमी! मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

गोंयकार तरुणांनी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा - मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी नोकऱ्यांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट करत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा:अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण, एकाला अटक… ‍

मंत्रालयीन सर्वच विभागांना नोकरी देण्यासंदर्भात निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्रालयांना पुढील दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्याचं बजावलंय. पीएमओ कार्यालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी सोमवारी सर्वच मानव संसाधनच्या सद्यस्थितीचा आढावा घेत समिक्षा केली. त्यानंतर, केंद्र सरकारअंतर्गत असलेल्या मंत्रालयीन सर्वच विभागांना नोकरी देण्यासंदर्भात निर्देश दिलेत.
हेही वाचा:पोलिसांवर उगारली लोखंडी सळी… ‍

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन दिली माहिती

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लक्षावधी बेरोजगार युवकांना मोठी संधी उपलब्ध होणारेय. केंद्र सरकारतर्फे पुढील 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्यात येतील. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिलीए. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी एप्रिल महिन्यातही संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी, नोकरी देण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसंच, सरकारमधील रिक्त जागांवर लवकरात लवकर पदांची भरती करावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यातून, देशातील युवकांना नोकरीची चांगली संधी मिळेल.
हेही वाचा:गांजा बाळगल्याप्रकरणी एक संशयित गजाआड… ‍

मोदी सरकार आता ‘मिशन मोड’मध्ये

केंद्र सरकारकडून बंपर म्हणजे १० लाख पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये अनेक सरकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे मोदी सरकार आता ‘मिशन मोड’मध्ये आले असून पुढील दीड वर्षात सरकार नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार , सैन्य दलात मागील दोन वर्षांपासून भरती झालेली नाही. रेल्वेमध्ये विविध विभागात सुमारे तीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत.
हेही वाचा:दिव्यांगांच्या मदतीसाठी आता ‘प्रशासन तुमच्या दारी’… ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!