‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा डायमंड लीगला हुकणार

सन्मान समारंभामुळे प्रकृती खालावली

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे नाव मागील काही दिवसांपासून सर्वत्र ऐकायला मिळत आहे. अगदी काही वेळातच नीरज  भारतातील सर्व खेड्यापाड्यात पोहचला आहे. सोशल मीडियावरही त्याचीच हवा आहे. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी पंतप्रधान मोदींपासून अनेकांनी त्याचा सन्मान केला. पण, हेच सन्मान समारंभ नीरजला महाग पडले आहेत.

हेही वाचाः जून, जुलैमध्ये राज्यातील २६६ जणांना डेंग्यू!

प्रकृती ठीक नसल्यानं माघार घेण्याचा निर्णय

मागील काही दिवस सतत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यामुळे नीरजचे डायट, सराव बिघडला असून त्याची प्रकृतीही थोडी खालावली होती. त्यामुळे आगामी डायमंड लीगमधून त्याला माघार घ्यावी लागणार आहे. त्याच्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची होती. पण, प्रकृती ठिक नसल्याने त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकृती अस्थिरतेमुळे सरावापासून दूर

नीरज चोप्रा सोबतचे सर्व सहखेळाडू हे ऑलिम्पिकनंतर त्यांच्या पुढील सीजनची सुरुवात करत आहेत. भारताचा स्टार भालाफेकपटू निरजलाही डायमंड लीगमध्ये सहभाग घेत सीजनची सुरुवात करायची होती. त्याने ऑलिम्पिकपूर्वी तसे नियोजनही केले होते. पण सततच्या शुभेच्छा कार्यक्रमामुळे नीरजचे त्याच्या डायटवरील लक्ष कमी झाले आहे. मध्यंतरी त्याला सर्दीही झाली होती. त्यामुळे तो सरावापासून दूर गेला आहे. ज्यामुळे त्याने डायमंड लीगमध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.  

हा व्हि़डिओ पहाः Politics | Tanawde sampark yatra| तानावडेंची कार्यकर्ता संपर्क यात्रा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!