Gold-Silver Price | सोने-चांदीच्या किमतीमध्ये वाढ…

गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक मानतात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : भारतात सोने आणि चांदी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कधी सोने महाग तर कधी स्वस्त होत आहे. आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर कमी-जास्त होत असल्याने याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येतो. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक मानतात. चांदी एक चमकदार धातू असून सोन्यापेक्षा स्वस्त आहे.
हेही वाचाःGoa Crime :कुर्टीत फ्लॅटमध्ये चोरी; दोघांना अटक…

चांदी सोन्यापेक्षा स्वस्त

भारतात चांदीचे दागदागिने सोन्यांच्या दागिन्यांइतकेच लोकप्रिय आहेत. चांदी एक चमकदार धातू असून सोन्यापेक्षा स्वस्त आहे. सोन्याचा दर हा गेल्या अनेक वर्षातील महागाई मोजण्याच मापन बनलाय.
हेही वाचाःGoa Crime | मित्रासह चौघांनी केला २० वर्षीय युवतीवर अत्याचार…

अशी तपासा दागिन्यांची शुद्धता

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. BIS CARE अॅप द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
हेही वाचाःस्वातंत्र्य सैनिकांच्या नावावरूनच ‘संग्राम’…

‘हे’ आहेत सोन्या-चांदीचे दर

दरम्यान लग्न सोहळ्यांना सुरुवात होत आहे. बाजारात सोन्या-चांदीचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 52,400 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,500 रुपये आहे.  
हेही वाचाःवाळपई ते म्हापसा मार्गावर बसेस वाढविण्याची मागणी…

मुंबई 48,03362,500
दिल्ली47,95162,440
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!