Gold-Silver Price | सोने-चांदीच्या किमतीमध्ये घसरण, जाणून घ्या आजचे दर !

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरामध्ये अंशतः घट झाली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : भारतात सोने आणि चांदी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक मानतात. चांदी एक चमकदार धातू असून सोन्यापेक्षा स्वस्त आहे. 1 किलो चांदीची किंमत 15 ग्रॅम सोन्याच्या बरोबरीने असते.
हेही वाचा:Robin Uthappa | रॉबिन उथप्पाचा क्रिकेटला अलविदा…

चांदी सोन्यापेक्षा स्वस्त

भारतात चांदीचे दागदागिने सोन्यांच्या दागिन्यांइतकेच लोकप्रिय आहेत. चांदी एक चमकदार धातू असून सोन्यापेक्षा स्वस्त आहे. सोन्याचा दर हा गेल्या अनेक वर्षातील महागाई मोजण्याच मापन बनलाय.
हेही वाचा:BJP | ८ आमदारांना भाजपात घेण्यास माझा ‘विरोध’ असता…

अशी तपासा दागिन्यांची शुद्धता

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. BIS CARE अॅप द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
हेही वाचा:एअर इंडिया कंपनीने केली ‘ही’ मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

‘हे’ आहेत आजचे दर

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरामध्ये अंशतः घट झाली असून चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. आज गुरुवारी मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,930 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये इतका आहे.
हेही वाचा:सन्मान न मिळाल्यानेच काँग्रेसचा त्याग…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!