‘शीतल’ने पकडली गोव्याची नौका!

गोव्याच्या एलईडी पर्ससीन ट्रॉलरवर कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या समुद्री हद्दीत मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांवर कारवाईसाठी मत्स्य विभागाचे खास गस्तीपथक तैनात आहे. या मत्स्य विभागाच्या ‘शीतल’ गस्ती नौकेने गोव्याच्या एलईडी पर्ससीन ट्रॉलरवर कारवाई केलीये.

हेही वाचा – हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

राज्याचा एलईडी पर्ससीन ट्रॉलर पकडला

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीतील शिरोडा समोरील २० वाव खोल समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणारा गोवा राज्यातील एलईडी पर्ससीन ट्रॉलर पकडून सोमवारी सकाळी मालवण बंदरात आणण्यात आलाय. अतिरिक्त सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रवींद्र मालवणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!