कोरोना रुग्ण आढळलेल्या भागातील २० घरं कन्टेनमेन्ट झोन, कोरोनाला रोखण्यासाठी योगी पॅटर्न

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची संख्या दिवसोंदिवस वाढतेय. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लसीकरण वाढवण्यात आलंय. तसंच राज्य सरकारकडून लोकांच्या जनजागृतीचेही प्रयत्न सुरू आहेत. मास्क, हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन ही त्रिसुत्री वापरण्याचं आवाहन केलं जातंय. मात्र आता योगी सरकारने यापुढे एक पाऊल टाकत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलायत.

कोरोना रोखण्यासाठी कडक नियमावली

ज्या ठिकाणी करोनाचा रुग्ण आढळतील त्याच्या आजूबाजूची २० घरं कंनटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जातील. ही २० घरं सील केली जातील. करोनाचा प्रादुर्भाव इतर लोकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. एकापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळल्यास ६० घरं सील केली जातील.

दरम्यान, लॉकडाऊनला विरोध करणारा महाराष्ट्रातली भाजपची नेतेमंडळी आता यावर काय प्रतिक्रीया देणार, याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!