मुली असुरक्षितच! 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापानं केला बलात्कार

Goan Varta Live | प्रतिनिधी
कल्याण : हाथरसमधील बलात्काराची घटना ताजी असतानाच आता बलात्काराची आणखी एक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जन्मदात्या पित्यानेच चिमुकलीचा बलात्कार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे बापलेकीच्या नात्याला काळीमा फासलाय.
पीडित मुलीच्या आईने याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. आरोपी बापाचं वय 32 वर्ष असून रामनगर पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडलाय.
नेमकं काय घडलं?
डोंबिवली पूर्वेत शेलारनाका परीसर आहे. पीडित मुलगी आणि तिची आई त्याच परिसरात असलेल्या आपल्या माहेरी गेली होती. दरम्यान, दुपारच्या सुमारास मुलगी खेळण्यासाठी म्हणून पुन्हा आपल्या घरी आली होती. त्यावेळी वडील घरात झोपले होते. झोपेतून जागे झालेल्या नराधम बापाने आपल्याच मुलीवर अतिप्रसंग केला. घाबरलेल्या मुलीनं कशीबशी आपली वडिलांच्या तावडीतून सुटका करत आजीचं घर गाठलं. घडलेला सगळा प्रसंग पीडित मुलीनं सांगितल्यानंतर नराधम बापाविरोधात आईने पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अटकही केली आहे.
गयामध्ये हाथरसची पुनरावृत्ती
देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांनी मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. कारण हाथरसप्रमाणेतच बिहार राज्यातही सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. बिहारमधील गयामध्ये एका अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. 29 सप्टेंबरला ही घटना घडली असून या घटनेनंतर पीडित तरुणीने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलंय. पीडित मुलगी शेजारील घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली असता ही धक्कादायक घटना घडली. याचवेळी गावातील मुलांनी तरुणीला एका घरात नेत तिच्यावर अतिप्रसंग केला. दरम्यान, आगामी बिहार निवडणुका पाहता विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. एकूणच देशभरातील वाढत्या बलात्काराच्या घटनांनी कायद्याचं धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केलाय.
हाथरस अपडेट्स
स्पेशल इनवेस्टिगेटीव्ह टीम हाथरसमधील पीडित कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यसाठी त्यांच्या घरी दाखल झाली असून तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय. काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसमधील पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं होतं.
Special Investigation Team (SIT) arrives at the residence of the victim of #Hathras incident. The team is recording the statements of the members of her family. pic.twitter.com/xkC6bmvzhr
— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2020
मैं हाथरस के पीड़ित परिवार से मिला और उनका दर्द समझा। मैंने उन्हें विश्वास दिलाया कि हम इस मुश्किल वक़्त में उनके साथ खड़े हैं और उन्हें न्याय दिलाने में पूरी मदद करेंगे।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 3, 2020
UP सरकार चाह कर भी मनमानी नहीं कर पाएगी क्यूँकि अब इस देश की बेटी को इन्साफ़ दिलाने पूरा देश खड़ा है।
मैं हाथरस के पीड़ित परिवार से मिला और उनका दर्द समझा। मैंने उन्हें विश्वास दिलाया कि हम इस मुश्किल वक़्त में उनके साथ…
Posted by Rahul Gandhi on Saturday, 3 October 2020