लखनऊमध्ये भररस्त्यात तरुणीची कॅब चालकाला मारहाण

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः एका तरुणीनं कॅब चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लखनऊ शहरातील अवध क्रॉसिंगजवळचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर #ArrestLucknowGirl हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सर्वात आधी हा व्हिडिओ ट्विटर वर Megh Updates नावाच्या एका हँडलवरून शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून तरुणीला अटक करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचाः मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्सचे ५ ऑगस्ट रोजी उद्घाटन
भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण
या व्हिडिओत एक तरुणी भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण करताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या चालकानं तिला धडक दिल्याचं ही तरुणी ओरडून सांगत आहे. दरम्यान, हा गोंधळ सुरू असताना एक वाहतूक पोलीस तिथं येतो आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही ती त्या चालकाला मारणं थांबवत नाही. शिवाय त्याचा फोनही तोडून टाकते. ही मुलगी उद्धट आहे, असं अनेकजण म्हणत असल्याचं या व्हिडिओत ऐकू येत आहे. तसंच “एवढा वेळ जर एखादा मुलगा मुलीला मारत असता तर लोकांनी काय केलं असतं.” असा प्रश्नही काही जण विचारत आहेत.
मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तीलादेखील केली मारहाण
हा व्हिडिओ गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. “कोणीतरी महिला पोलिसांना बोलवा,” अशी विनवणी हा कॅब ड्रायव्हर करत आहे. याचवेळी एका व्यक्तीने मधे येऊन या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर तिने त्या व्यक्तीलादेखील मारहाण केल्याचं दिसतंय.
#UttarPradesh | FIR Registered by UP Police u/s 394, 427 at Krishna Nagar Police Station, Lucknow against a girl seen assaulting a cab driver and another man in a viral video. #ArrestLucknowGirl pic.twitter.com/NQoPli5VIh
— Asianet Newsable (@AsianetNewsEN) August 2, 2021
महिलेविरुद्ध गुन्हा नोंद
या वायरल व्हिडिओवर अतिरिक्त पोलिस उपायुक्त चिरंजीव नाथ सिन्हा यांनी सांगितलं की, आम्ही संबंधित महिलेविरोधात कलम 394 आणि 427 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रियदर्शनी नारायण असं महिलेचं नाव असून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.
#ArrestLucknowGirl
— Sunami Aditya (@TsunamiAditya) August 2, 2021
Power of social media and Twitter 🔥 action will be taken against that girl now ! pic.twitter.com/5oqhcIFYOI
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत या तरुणीला अटक करण्याची मागणी केली आहे. काही नेटकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना टॅग करून या तरुणीविरोधात कारवाई करा, असं म्हटलं आहे. तर, हा व्हिडिओ शेअर करत “हेच स्त्री सक्षमीकरण आहे का?” असा सवालही काहींनी केला आहे. “या तरुणीने भररस्त्यात केलेल्या कृत्याचं कोणीच समर्थन करणार नाही. ती पूर्णपणे चुकीची वागली आहे. मध्यस्थी करणाऱ्यालाही तिने मारहाण केली आहे, ही तरुणीच आरोपी आहे,” असं एका युजरने म्हटलं आहे.
व्हिडिओ पहाः
The girl is repeatedly slapping the boy. She also damages his cell phone. She also slaps a man who tries to intervene. What if the boy hits her back? Both the girl and the boys know that the boys can't hit the girl. And that is the advantage girl takes. #Lucknow #LucknowBitch pic.twitter.com/iuZ3bLzOvy
— Mukul Bhatnagar (@mukulfaiz) August 1, 2021