CORONA UPDATE | विनाकारण घराबाहेर पडताय? मग हे वाचा…

'या' शहरात सुरू आहे रॅपिड टेस्ट

Goan Varta Live | प्रतिनिधी

कणकवलीः तालुक्यात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता कणकवली पटवर्धन चौकात आरोग्य, पोलिस प्रशासन यांच्यामार्फत कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यात आतापर्यंत दोन रुग्ण पॉझिटिव्ह मिळालेत.

हेही वाचाः कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा गोव्याचा वेग चिंताजनक! पण गोंयकरांना त्याचं काही पडलंय का?

विना मास्क फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट

विनाकारण, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची ऑक्सिजन लेवल, टेंपरेचर तपासून कोरोनाची लक्षणे आढळल्यास लगेच रॅपिड टेस्ट केली जात आहे. तसंच पर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची ही तपासणी होणार असल्याची माहिती उपस्थित आरोग्य पथकाने दिली.

आरोग्य अधिकारी सुविधा सावंत, महसूल कर्मचारी तसंच पोलिस अधिकारी नगर पंचायत कर्मचारी यांच्या मार्फत ही आरोग्य तपासणी होत आहे. यावेळी आरोग्य विभागाचे सुविधा सावंत, महसूल अरविंद गवळी, पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील, नगरपंचायत कर्मचारी रविंद्र महाडेश्वर, प्रशांत राणे, रमेश कदम उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!