भाजप नेते गौतम गंभीर यांच्या अडचणींत वाढ

'फॅबिफ्लू' औषधाची अनधिकृतरित्या साठेबाजी, खरेदी आणि विक्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांच्या अडचणींत वाढ झालीय. गुरुवारी उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत दिल्ली सरकारच्या औषध महानियंत्रकांनी गौतम गंभीर फाऊंडेशन कोविड-19 औषधांची अवैध साठेबाजी आणि वितरण प्रकरणात दोषी आढळल्याचं सांगितलंय.

हेही वाचाः SDG 2021 । देशातील राज्यांत गोवा चौथ्या, तर केरळ पहिल्या स्थानी

फॅबिफ्लूची अनधिकृतरित्या साठेबाजी, खरेदी आणि विक्री

कोविड-19 रुग्णांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू या औषधांची अनधिकृतरित्या साठेबाजी, खरेदी आणि विक्री प्रकरणात गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी आढळलंय. इतकंच नाही तर, या प्रकरणात फाउंडेशन तसंच औषध विक्रेत्यांविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी औषध महानियंत्रकांकडून करण्यात आलीय.

हेही वाचाः कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना पाच वर्षं पगार

आमदार प्रवीण कुमार दोषी

‘ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स’ कायद्यांतर्गत आमदार प्रवीण कुमार हेदेखील अशाच प्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळले आहेत, अशी माहितीही औषध नियंत्रकांनी उच्च न्यायालयात दिली आहे. औषध नियंत्रकांनी या प्रकरणाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देतानाच उच्च न्यायालयानं या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जुलै रोजी निर्धारित केलीय.

हेही वाचाः गोव्यात विवाहपूर्व समुपदेशनाला भाजपचा विरोध

काय आहे प्रकरण

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजधानी दिल्लीत करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असताना अनेक हॉस्पिटल्समध्ये औषधं आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. अशावेळी दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीर यांच्यासहीत काही भाजप नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना मोफत फॅबीफ्लू उपलब्ध करून दिले होते. यासाठी अवैध पद्धतीनं ऑक्सिजन सिलिंडर, फॅबिफ्लू, रेमडेसिविर यासारख्या औषधांचा साठा करून ते नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्याचं समोर आलं होतं. अवैध साठेबाजी प्रकरणात काही आप नेत्यांचीही नावं आहेत.

हेही वाचाः आना फोंत उद्यानाच्या दुरूस्तीचा कृती आराखडा तयार करा

यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका जनहीत याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं औषध महानियंत्रकांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीच्या अहवालात आरोपींना क्लिन चीट देण्यावरून न्यायालयानं औषध महानियंत्रकांवर चांगलेच ताशेरे ओढले होते. तसंच पुन्हा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले होते. त्यानंतर आता औषध महानियंत्रकांनी आपली बाजू मांडताना औषधांच्या अवैध साठेबाजी प्रकरणात गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी आढळल्याचं म्हटंलय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!