गौतम गंभीर करोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर करोनाच्या विळख्यात सापडला आहे. गंभीरने सोशल मीडियावर ही माहिती दिली. करोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर गंभीरची चाचणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे गंभीरने म्हटले आहे. आहेत. गौतम गंभीरने गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना करोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे.

ट्विट करत दिली माहिती

“मी सौम्य लक्षणांनंतर करोना पॉझिटिव्ह आढळले आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांची चाचणी करून घ्या आणि सुरक्षित रहा,” असे गौतम गंभीरने ट्विटमध्ये म्हटले आहे.

२०१९ गौतम गंभीर दाखल झाले राजकारणात

२०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपाच्या तिकीटावर लढून गंभीरने जिंकली. ते पूर्व दिल्लीचे खासदार आहेत. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधारही राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआर २०१२ आणि २०१४ मध्ये चॅम्पियन बनले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!