महत्त्वाचं! सिलिंडरचं अनुदान संपुष्टात येण्याची शक्यता, कारण…

टप्प्याटप्प्यानं अनुदान कमी केलं असल्याचं चित्र

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकीकडे इंधनाचे दर वाढलेले आहेतच. अशातच आता घरगुती वापराचा सिलिंडरी 50 रुपयांनी महागलेलाय. तर दुसरीकडे केंद्र सरकार घरगुती सिलिंडरवर मिळणारं अनुदान संपुष्टात आणणार की काय, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. केंद्र सरकारनं घरगुती सिलेंडरवरील मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी केलंय. २७० वरून थेट ४० रुपयांपर्यंत खाली आणले आहे.

दर महिन्याला बदलते किंमत?

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरचे दर कमी जास्त होत असतात. नवे दर नव्या महिन्याच्या 1 तारखेला जाहिर होतात. मात्र यंदा 1 फेब्रुवारील सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर गॅसच्या किंमती गगनाला भिडल्यात. त्याचा सामान्य माणसावर परिणाम होत आहे. केंद्र सरकारने सिलिंडरचे नवे दर चार फेब्रुवारीला जाहीर केले आणि त्यामध्ये थेट २५ रुपयांची वाढ केली. चालू महिन्यात सोमवारी पुन्हा ५० रुपयांची वाढ केली. त्यामुळे फेबुवारी माहिन्यात दोन वेळ एकूण ७५ रुपयांची दरवाढ झाली. तसेच सरकारने अर्थसंकल्पात गॅस सिलेंडरवरील अनुदानाचा कोटा कमी केल्याने ग्राहकांना मिळणारे अनुदानही कमी झालं आहे. सध्या एका विना अनुदानित सिलिंडरसाठी ८२१ रुपये मोजावे लागत असून त्यावर केवळ ४० रुपये अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडर ७८0च्या पार गेली आहे. रुपयांचे पडत आहे.

दरात वाढ, अनुदान तेवढेच

गेल्यावर्षी आक्टोबर महिन्यात सिलिंडरचे दर ६४६ होते त्यावर ४० रुपये अनुदानाच्या स्वरूपात मिळत होते. गेल्या सात महिन्यात टप्प्याटप्प्याने सिलिंडरची दरवाढ झाली असून सध्या सिलेंडरचे दर ८२१ झाले तरी अनुदान ४० रुपयेच मिळत आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!