सर्वसामान्यांना मोठा फटका! गॅस सिलिंडरचे दर फेब्रुवारीत तिसऱ्यांदा वाढले

३ महिन्यांत २०० रुपयांची वाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरातही सलग वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. नवे दर गुरुवारपासून लागू झालेत. फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस सिलिंडरचे भाव वाढवण्यात आलेत. पेडणे तालुक्यात गॅस सिलिंडरच्या दरांनी ८०० चा आकडा पार केलाय. पेट्रोल-डिझेल सोबतच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत असल्यानं नागरिकांचं बजेट कोलमडलं आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

हेही वाचाः राज्याच्या अर्थसंकल्पाकडे जनतेचं लक्ष

फेब्रुवारी २०२१ मध्ये तिसऱ्यांदा दरवाढ

फेब्रुवारी २०२१ मध्ये तिसऱ्यांदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. सर्वप्रथम ४ फेब्रुवारी २०२१ रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा ५० रुपयांची वाढ करण्यात आली. मग आता तिसऱ्यांदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झालीये. नव्या दरवाढीमुळे दिल्लीत आता १४.२ किलोग्रॅम एलपीजी गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत, जे ३ फेब्रुवारी रोजी ७९४ रुपये इतके होते. मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना ७९४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकातामध्ये ८२० रुपये आणि चेन्नईत ८१० रुपये इतके ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

तीन महिन्यांत २०० रुपयांची वाढ

गेल्या तीन महिन्यांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांनी वाढ झाली आहे. १ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडरचा भाव ५९४ रुपयांवरुन ६४४ रुपये इतका झाला होता. १ जानेवारी रोजी पुन्हा ५० रुपयांची वाढ झाली यामुळे ६४४ रुपयांवरुन सिलिंडरचा दर ६९४ रुपये इतका झाला. ४ फेब्रुवारी रोजी पुन्हा वाढ झाल्याने हा भाव ७१९ रुपये इतका झाला. १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा दरवाढ होऊन ७१९ रुपयांवरुन ७६९ रुपये इतका झाला. त्यानंतर आज पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली आहे. आता सिलिंडरचा दर ७६९ रुपयांवरुन ७९४ वर पोहोचलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!