भाजपाचे माजी मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

राजिंदरपाल सिंह भाटिया खुज्जी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भाजपाचे जेष्ठ नेते व खुज्जी विधानसभा मतदार संघाचे माजी मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्याचं कारण गुलदस्त्यात

आत्महत्याचं कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. राजिंदरपाल सिंग भाटिया खुज्जी विधानसभा मतदारसंघातून  तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

रविवारी केली आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार रजिंदरपाल सिंग भाटिया हे आपल्या लहान भावासोबत छुरिया भागात राहत होते. रविवारी संध्याकाळी ते एकटेच घरी होते. कुटुबांतील सदस्य जेव्हा घरी पोहचले तेव्हा ते गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. या सर्व घटनेची महिती पोलिसांना देण्यात आली.   सुत्रांच्या माहीतीनुसार ते गेल्या काही दिवसापासून आजारी होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!