राजौरीमध्ये चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान

चकमकीमध्ये सुरक्षा दलातील जेसीओ शहीद

Goan Varta Live | प्रतिनिधी

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये संरक्षण यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु झालेल्या चकमकीमुळे सदर परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. राजौरीतील थन्ना मंडी भागामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीमध्ये जवानांकडून एकाचा खात्मा करण्यात यश आलं. 

हेही वाचाः मोठी बातमी: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात घुसले तालिबान, राशिद खानचा सहकारीही सोबत

चकमकीमध्ये सुरक्षा दलातील जेसीओ शहीद

चकमकीमध्ये सुरक्षा दलातील जेसीओ शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय सैन्य आणि सीआरपीएफनं केलेल्या या मोहिमेमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनीही योगदान दिलं. या भागात अद्यापही शोधमोहिम सुरु असल्याचं कळत आहे. 

3-4 दहशतवादी लपले असल्याची माहिती

राजौरी येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दुपारी सुरु झालेल्या या चकमकीमुळं अतिशय सतर्कता पाळण्यात येत आहे. सध्या या भागात 3-4 दहशतवादी लपले असल्याचं म्हटलं जात आहे. दहशतवाद्यांबाबतची माहिती मिळताच त्यांचा खात्मा करण्यासाठी या भागात तातडीनं सुरक्षा वाढवण्यात आली. यानंतर दहशतवाद्यांनी या भागात गोळीबार सुरु केला. ज्यामध्ये एक जवान शहीद झाले. ज्यानंतर सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं. 

हेही वाचाः ‘सोशियाद’ची जमीन पुढील सुनावणीपर्यंत ‘जैसे थे’ ठेवा

याच भागात यापूर्वीही झाली होती असाच प्रकारची चकमक  

ऑगस्ट महिन्यात या भागात घडलेली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी इथं 6 ऑगस्टला घालेल्या घटनेमध्ये लष्करच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 

हा व्हिडिओ पहाः POLITICS | BJP | स्वपक्षीय मंत्र्यावर टीका करणं भोवलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!