प्रेयसीला वैतागून माथेफिरुने तिच्या कुटुंबालाच संपवलं! शेतात पुरलेले मृतदेह हाती

एखाद्या सस्पेन्स थ्रिलरलाही लाजवेल असा घटनाक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एकीकडे गोव्यातही आत्महत्या, अपहरण, हत्या यांसारख्या घटना सातत्यानं समोर येत असताना आता एक भीषण आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला वैतागून तिचं कुटुंबच संपवणाऱ्या एका माथेफिरुनं केलेलं कृत्य पाहून पोलीसही चक्रावून गेलेत. मध्य प्रदेशच्या जवळ देवास जिल्ह्यात ५ लोकांची हत्या करुन त्यांना खोल खड्डा करुन पुरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दृश्यम सिनेमालाही लाजवेल असा थरारक घटनाक्रम पोलिस तपासातून उघड झालाय.

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या एका शेतात एमपी पोलिसांनी तपास केला. यानंतर खोदकाम सुरु करण्यात आलं. जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आलेल्या खोदकामानंतर तब्बल ५ जणांचे मृतदेह हाती लागलेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या ५ जणांचे मृतदेह हाती लागलेत, ते अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेत. १३ मेपासून या पाचही व्यक्तींचा शोध सुरु होता.

हेही वाचा : …म्हणून त्या महिलेनं पुलावरुन मांडवीत उडी मारली होती!

मध्य प्रदेश पोलिसांकडून बेपत्ता पाच जणांचा सातत्यानं शोध घेतला जात होता. या ५ जणांपैकी १ महिला, ३ तरुणी आणि एका तरुणाचा शोध पोलीस घेत होते. मात्र तपासानंतरही पोलिसांना शोध घेण्यात अडचणी येत होत्या. त्या सोबतच मृतदेहांचा शोध लागल्यानंतर जे कारण या क्रूर हत्येमागे समोर आलंय, ते ऐकून पोलीसही चक्रावलेत.

मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी लागलीत संशयित आरोपींना ताब्यातही घेतलंय. सुरेंद्र चौहान नावाच्या एका व्यक्तीच्या शेतात ५ मृतदेह आढळून आलेत. एक-एक करुन पोलिसांनी या संपूर्ण हत्याकांडाचा छडा लावलाय. भलामोठा खड्डा खणून हे मृतदेह लपवण्यात आल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. तब्बल १० फूट खोल खड्ड्यात हे मृतदेह पुरले होते. ज्याच्या शेतात हे मृतदेह आढळलेत, त्या सुरेंद्रचं एका मुलीशी प्रेम प्रकरण होतं. त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा : अवघ्या 100 रुपयांसाठी माजी कुलगुरूंची हत्या !

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!