73 हजार कोटी घ्या आणि खर्च करा… केंद्राची नवी योजना!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नवी घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशांतर्गत मागणीचं प्रमाण वाढावं यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सोमवारी 73 हजार कोटी रूपयांच्या महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. (Finance Minister Nirmala Sitharaman announced major schemes) नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या योजनांसंबंधीच्या धोरणात्मक प्रस्तावांची माहिती दिली. यामुळे बाजारात पैसा येईल, असा अंदाज वर्तवला जातो आहे.

याअंतर्गत प्रवासासाठीच्या लिव्ह ट्रेवल कन्सेशन अर्थात एलटीसी सवलत व्हाऊचर, तसेच फेस्टीवल ऍडवान्सची आगाऊ रक्कम वितरीत केली जाईल. या योजनांतून एकंदर मागणीत 36 हजार कोटी रुपयांची वाढ होईल. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारांच्या वतीने 37 हजार कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला जाणार असल्याचं सितारामन यांनी सांगितलंय.

कुठे, किती आणि कसे पैसे?

या नव्या प्रस्तावानुसार केंद्र सरकार सुमारे 5 हजार 675 कोटी रुपये खर्च करण्याची शक्यताय. अर्थमंत्र्यांनी संकेत दिलेत. जर देशातील राज्य सरकारांनी या प्रस्तावांवर एकसारखी अंमलबजावणी केली तर एकूण 28 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त ग्राहकांची मागणी निर्माण होईल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय. विशेष उत्सव अ‍ॅडव्हान्स योजनेंतर्गतसर्व सरकारी कर्मचार्‍यांना १० हजार रुपयांची व्याजमुक्त अ‍ॅडव्हान्स उपलब्ध करुन देण्यात येईल, असंही निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय. 50 टक्के राज्यांनी विचार करून ही योजना अवलंबिली तर मागणी क्षेत्रात जवळपास आठ हजार कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

भांडवली खर्चाच्या अंतर्गत राज्यांना विशेष सहाय्य करण्याच्या आपल्या घोषणेमध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं. यामध्ये व्याजाच्या परतफेडीची मुदत आणि 12 हजार कोटी रुपयांचं विशेष व्याजमुक्त कर्ज वितरित केलं जाणारे. सहाय्य योजनेंतर्गत 2 हजार 500 कोटी रुपये ईशान्य आणि उत्तरेतील राज्यांना दिली जाणार आहेत. सात हजार पाचशे कोटी रूपये इतर राज्यांना वित्त आयोगाच्या डिव्होल्यूशनमधील वाट्याच्या प्रमाणात देण्यात येतील.

लोकं खर्च करतील का?

रस्ते, संरक्षण पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, नागरी विकास आणि देशांतर्गत उत्पादित भांडवलाची उपकरणे यावर भांडवली खर्चाच्या माध्यमातून केंद्रामार्फत 25 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार असल्याचेही मंत्र्यांनी जाहीर केलंय. अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे लोकं पैसे खर्च करतील आणि त्यामुळे मागणी वाढून बाजारातील चलनास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा –

TOP 10 | पाहा आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

कोळसा खाणी लिलावापासून प्रमुख स्टील कंपन्यांना दूरच

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!