फिफा विश्वचषक २०२२ संकटात?

७ युरोपीय देशांची बंडखोरी : 'वन लव्ह' आर्मबँडला समर्थन

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोहा : फिफा विश्वचषक २०२२ मध्ये सर्व संघांनी अद्याप आपापल्या मोहिमेला सुरुवातही केलेली नाही, परंतु त्याआधीच विवाद सुरू झाले आहेत. जर या प्रकरणाने पेट घेतला तर टूर्नामेंटच्या मध्यावरच ७ देश विश्वचषकातून माघार घेऊ शकतात.
हेही वाचाःनायजेरियन नागरिकांवर धारदार हत्याराने हल्ला, चौदा संशयित आरोपमुक्त…

७ युरोपीय देशांपैकी जर्मनीनेही नोंदवला निषेध

हे ७ देश आहेत ज्यांना फिफाने इशारा दिला आहे. फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने ७ युरोपीय देशांना इशारा दिला होता की, जर त्यांचा कोणी खेळाडू वन लव्ह आर्म बँड घालून मैदानात उतरला, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ७ युरोपीय देशांपैकी जर्मनीनेही याबाबत निषेध नोंदवला आहे. जपानविरुद्धच्या सामन्यापूर्वी काढलेल्या ग्रुप फोटोमध्ये त्यांच्या खेळाडूंनी तोंडावर हात ठेवला होता. खेळाडूंशिवाय जर्मनीच्या मंत्री नॅन्सी फीजर यांनीही विरोध दर्शवला. त्या ‘वन लव्ह आर्मबँड’ परिधान करून सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या, ज्याचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
हेही वाचाःओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय तज्ज्ञ समितीची नियुक्ती

फिफाच्या इशाऱ्यामुळे घबराट

विविधतेचे प्रतीक म्हणून रंगीत वन लव्ह आर्मबँड परिधान केल्याबद्दल खेळाडूंना दंड ठोठावण्यात येईल, असे फिफाने म्हटले होते. फिफाने ज्या सात युरोपीय देशांसाठी हे सांगितले होते, त्यांच्या कर्णधारांनी वन लव्ह आर्मबँड घालून मैदानात उतरण्याची योजना आखली होती. कोणत्याही संघाच्या खेळाडूंनी असे केल्यास त्यांना लगेच पिवळे कार्ड दाखवले जाईल, असेही फिफाने म्हटले आहे. फिफाच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांमध्ये जर्मनीचे प्रशिक्षक हॅन्सी फ्लिक आणि फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष न्यूएन्डॉर्फ यांचाही समावेश होता.
हेही वाचाःअकरा महिन्यांपूर्वीचा ड्रग्ज ‘निगेटिव्ह’; नायजेरियनाची निर्दोष सुटका..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!