दुर्दैवी अपघात! 1 वर्षाचं बाळ सर्वांचा डोळा चुकवून घराबाहेर पडलं, अन् नको ते घडलं

बाराव्या मजल्यावरून खाली पडलं बाळ; पहिल्या वाढदिवशीच गेलं देवाघरी; आईवडिलांवर कोसळला दुःखाचा डोंगर

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः आईवडील आणि घरच्यांचं लक्ष नसताना दारातून रांगत रांगत बाहेर आलेलं बाळ बाराव्या मजल्यावरून खाली कोसळलं. या दुर्घटनेत बाळाचा जीव गेला. या घटनेमुळे बाळाच्या आईवडिलांवर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.

हेही वाचाः ‘स्वयंपूर्ण गोंय’अंतर्गत ३०० लोक आत्मनिर्भर

अशी घडली दुर्घटना

ही घटना घडलीय दिल्लीच्या नोएडामधील कासना ग्रीन वन हाऊसिंग सोसायटीमध्ये. या इमारतीत बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाला 1 वर्षांचा मुलगा होता. नेहमी घरात खेळणारा हा मुलगा नेमका सर्वांचा डोळा चुकवून घराच्या बाहेर पडला. रांगत रांगत तो कधी गेटच्या बाहेर गेला, हे कुणालाच समजलं नाही. बाहेर गेल्यानंतर जिन्यापाशी लावलेल्या रेलिंगमधून तो पलिकडे गेला आणि क्षणार्धात बाराव्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर जाऊन पडला. गेटच्या बाहेरही त्यावेळी कुणी नसल्यामुळे बाळाच्या जिवाला धोका असल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही. जेव्हा बाळ कोसळल्याचं समजलं, तेव्हा फार उशीर झाला होता.

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. प्रॉपर्टी डीलर सतेंद्र यांचे कुटुंब कासा ग्रीन सोसायटीच्या 12 व्या मजल्यावर राहते. त्यांचा मुलगा रिवानचा सोमवारी पहिला वाढदिवस होता. पाहुणे आणि कुटुंबीय केक कापण्याच्या तयारीत होते, तेव्हा अपघात झाला.

हेही वाचाः जलस्त्रोत खात्याचे रेस्ट हाऊस आता फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठीच

बाळाचा होता पहिला वाढदिवस

ही घटना घडली, त्या दिवशी बाळाचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे या कुटुंबाचे नातेवाईक, मित्र, शेजारी अशी काही निवडक मंडळी घरात जमली होती. अनेकजण एकत्र आल्यामुळे सगळेच गप्पांमध्ये रमले होते. तर बाळाचे आईवडिल कार्यक्रमाच्या आणि पाहुणचाराच्या गडबडीत होते. या सगळ्यात बाळाकडे काही क्षणांसाठी सर्वांचंच दुर्लक्ष झालं. घराच्या हॉलमध्ये खेळणारं आणि इकडे तिकडे रांगणारं बाळ उघड्या दारातून आणि गेटमधून बाहेर कधी पडलं, ते कुणालाच कळलं नाही. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 1 वर्षांचं बाळ आणि तेदेखील त्याच्या वाढदिवशीच दगावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः चतुर्थीआधी टॅक्सीच्या मीटरचा प्रश्न निकाली निघणार? लोबो म्हणतात की…

अपघाताच्या वेळी रिवानचे मामा आजोबा- आजी आणि जवळचे नातेवाईकही घरात उपस्थित होते. आनंदाच्या भरात अचानक या अपघातामुळे घरात दु: खाचा डोंगर कोसळला. कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मुलाचा मृतदेह घेऊन हे कुटुंब गाझियाबादमधील त्यांच्या वडिलोपार्जित घरी गेले. मात्र, पोलिसांनी लोकांचे जबाब नोंदवले आहेत.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!