केरळमध्ये बसचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, ३८ जखमी…

पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी इथं मध्यरात्री अपघात झाला

रजत सावंत | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : केरळमध्ये पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण गंभीर जखमी झाले आहेत. पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी इथं मध्यरात्री हा अपघात झाला.
हेही वाचाःCM ON HOUSE LAND OWNERSHIP : सरकारी जमिनीतील घरांच्या मालकीबाबत मुख्यमंत्र्यांच मोठं विधान, वाचा सविस्तर…

पर्यटक बसची केएसआरटीसीच्या बसला मागून धडक

याबाबत अधिक माहिती अशी की, शाळकरी मुलांना घेऊन जाणारी पर्यटक बस ही बसलियोस बिद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन एर्नाकुलम येथून उटी येथे जात होती, तर त्याचवेळी केएसआरटीसीची बस कोईम्बतूरच्या दिशेने निघाली होती. या दरम्यान शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या पर्यटक बसने केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. या बस अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आणि ३८ जण जखमी झाले.
हेही वाचाःसांगेतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी ‘या’ तारखेला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!