5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

1 गोंयचो आवाजचीही राजकारणात एन्ट्री

राज्यात आणखी एका राजकीय पक्षाचा उदय, गोंयचो संघटना लढणार विधानसभा निवडणूक, पत्रकार परिषद घेऊन केली राजकीय पक्षाची घोषणा

२. प्रतिमा कुतिन्हो यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी

नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसचा उमेदवार निश्चित, प्रतिमा कुतिन्हो यांना उमेदवारी, गिरीष चोडणकर यांची माहिती

३. भाजपनं महापालिकेसाठीचा एक उमेदवार बदलला

पणजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने एक उमेदवार बदलला, २९ क्रमांक प्रभागातून शैलेश साळगावकरांचे नाव झाले होते जाहीर, निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची साळगावकरांची स्पष्टोक्ती, आता स्लिवेस्टर फर्नांडिस २९ क्रमांक प्रभागातून भाजपसाठी निवडणूक लढवणार

४. मार्ना शिवोली ग्रामसभेत शाब्दिक चकमक

मार्ना शिवोली ग्रामसभेत शाब्दिक चकमक, हजेरी पट्टीवरील सह्या खोडल्या, पोलिस बंदोबस्तात पार पडली ग्रामसभा

५ आरजीच्या कॉर्नर मीटल उत्स्फूर्त प्रतिसाद

मयेतील आरजीच्या कॉर्नर मीटला उत्स्फूर्त प्रतिसाद, संपूर्ण राज्यभरातील जनतेची आरजीच्या कॉर्नर मीटला हजेर, कॉर्नर मीटमध्ये मनोज परबांची सरकारवर टीका

६. प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या दोघांना अटक

प्रवाशांची लुबाडणुक करणाऱ्या दोघांना अटक, म्हापशातील कदंब बस स्थानकावर प्रवाशांची लुबाडणुक केल्याचा आरोप, दोघा संशयीतांना म्हापसा पोलिसांनी घातल्या बेड्या

७. सांकवाळच्या सरपंचांनी रस्ता खोदकाम बंद पाडलं

सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांनी रस्ता खोदकाम बंद पाडलं, परवानगी न घेता काम केल्यानं बोरकरांनी व्यक्त केला संताप, झुआरी नगर येथील एमईएस महाविद्यालयासमोर जलवाहिनीसाठी सुरू असणारं काम ठप्प

८. रेल्वे दुपदरीकरणाला ग्रीन सिग्नल

रेल्वे दुपदरीकरणाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी, वन्यजीव मंडळाचीही मान्यता, १२१ हेक्टर वनक्षेत्रावर गदा

9 राज्यात 54 नव्या रुग्णांचं निदान

राज्यात रविवारी 54 नव्या कोरोना रुग्णांचं निदान, तर एकाचा मृत्यू, राज्याचा रिकव्हरी रेट 97.45 टक्क्यांवर

१० मास्क न घातल्यास १ हजारांचा दंड?

मास्क न घातल्यास १ हजारांचा दंड शक्य, आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव, राज्यात येणाऱ्या पर्यटकांमुळे करोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती, मास्क न घालता फिरणाऱ्या पर्यटकांना दंड ठोठावण्याची मागणी

हेही वाचा – महत्त्वाची बातमी! कुणकेश्वरची महाशिवरात्रीची जत्रा यंदा रद्द

११ आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर ३१ मार्चपर्यंत बंदी

आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारचा निर्णय, डीसीजीएने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबतचे आदेश, इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर आदेश लागू नाही

१२. महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा, विरोधकांच्या मागणीनंतर संजय राठोड बॅक फूटवर, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिला राजीनामा

१३. माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न- राठोड

राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची प्रतिक्रिया, माझ्या समाजाची बदनामी करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न, सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरडं राजकारण सुरू असल्याचा संजय राठोडांचा आरोप

१४. भेट, चर्चा आणि बरंच काही…

खासदार उदयन राजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, मराठा आरक्षण आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीवर तासभर दोघांमध्ये चर्चा

१५. अतिरेकी संघटनांनी स्वीकारली जबाबदारी

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याची दहशतवादी संघटनेनं स्वीकारली जबाबदारी, संस्थेकडून सोशल मीडियावर याबाबत पोस्ट, मात्र दहशतवादी संस्था चर्चेत येण्यासाठी असं करत असल्याचा गृह मंत्रालयाची माहिती

हेही वाचा – Accident | ट्रकची ट्रकला धडक चालक गंभीर जखमी

१६ तरुण तेजपालचा ‘निकाल’ लवकरच

तरुण तेजपालनं केलेल्या कथित बलात्कारप्रकरणी सोमवारी अंतिम सुनावणी, सात वर्षांनंतर निकाल शक्य, न्यायालयाच्या निवाड्याकडे गोव्यासह संपूर्ण देशाचं लक्ष.

१७ २०२१ मधील इस्त्रोची पहिली मोहीम यशस्वी

इस्त्रोने अंतराळात 19 सॅटेलाईट केले लॉंच, 2021 मधील पहिलं अंतराळ अभियान यशस्वी, श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटरमधून लॉंच केली सॅटेलाईट

१८. रिलायन्स जिओचा बडा धमाका

रिलायन्स जिओचा बडा धमाका, अवघ्या ७७० रुपयात वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा

१९ सोने-चांदी बाजार गडगडला

चांदी झाली स्वस्त, भाव दीड हजारांनी घसरला, सोन्याच्या किमतीतही ५०० रुपयांनी घट, सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण बाजार गडगडला

२०. टाटा- महिंद्रा कांटे की टक्कर

टाटा नेक्सनला टक्कर देण्यासाठी महिंद्राची इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात, ३७३ किलोमीटरची रेंज असणाऱ्या महिंद्राच्या कारची चाहत्यांमध्ये उत्सुकता

हेही पाहा – तुफान गाजतंय! अभिमान वाटावा असं कोकणीतलं Unplugged गाणं अजून नाही पाहिलं?

२१. आयसीसी रेटिंगच्या टॉप १० मध्ये ‘हिटमॅन’

आयसीसी रेटिंगमध्ये रोहित शर्मा टॉप १० मध्ये, आठव्या स्थानी हिटमॅनचं नाव, तर आर. अश्विन टॉप ३ मध्ये

२२. आशिया चषक पुन्हा रद्द?

आशिया चषक पुन्हा रद्द होण्याची शक्यता, पाकिस्तान क्रिकेट मंडळानं भारतावर खापर फोडल्यानं आशिया चषकावर पुन्हा एकदा सावट

२३ मेडिकल कंडिशन… सर्जरी…!

अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा खालावली, शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती, खुद्द बिग बींनी ब्लॉगमधून दिली माहिती, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने चाहते चिंतीत

२४ ‘शोर मचेगा’

मुंबई सागामधील हनी सिंगचं ‘शोर मचेगा’ गाणं रिलीज, चाहत्यांचा गाण्याला उत्स्फूर्च प्रतिसाद, गाणं व्हायरल

२५ अधिक मुलं जन्माला घालणं दांपत्याला भोवलं

चीनमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक मुलं जन्माला घालणं दांपत्याला भोवलं, दोन मुलांसाठी परवानगी असताना सात मुलं जन्माला घातल्याबद्दल दांपत्याला चीन सरकारकडून तब्बल 1 कोटींचा दंड

हेही वाचा – बप्पी लहरी एवढं सोनं का घालतात?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!