मुलाला शाळेत ऍडमिशन नाही मिळालं, म्हणून चक्क मंत्रालयात बॉम्ब ठेवला?

काय आहे नेमकं प्रकरण?

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. मुंबईतील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल काही दिवसांपूर्वी एका व्यक्ती केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता हा ईमेल करणा-याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी शैलेंद्र शिंदे नावाच्या व्यक्तीने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल गृह विभागाला केला होता. त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यावर ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं. अखेर अफवा पसरवून दिशाभूल केल्याप्रकरणी शैलेंद्र शिंदे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

हेही वाचा : सावंत सरकार गोव्याच्या भविष्याशी खेळतंय

असं करण्यामागचं कारण काय?

ई-मेल करणाऱ्या शैलेंद्र शिंदेला आता अटक करण्यात आली असून आता त्याची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीदरम्यान, त्यानं असं का केलं, याचं कारणही पोलिसांसमोर सांगितलंय. मुलाला शाळेत ऍडमिशन न मिळाल्याने त्यांने असा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई मेल बी. टी. कवडे रोड परिसरात रहाणार्‍या शैलेंद्र शिंदे या व्यक्तिने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबधित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्याकडे अधिक चौकशी पोलिसांनी केली. त्यातून हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा : TOP 25 | महत्त्वाच्या २५ घडामोडींचा झटपट आढावा

शैलेंद्र शिंदे याने आपल्या मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाले नसल्याने, असा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितलंय. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असून या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!