अन् पिशव्या उघडल्यावर आढळले बेंटेक्सचे दागिने

कर्ज न फेडल्यामुळे बँकेने सोनं लिलावात काढलं तेव्हा प्रकार उघडकीस

Goan Varta Live | प्रतिनिधी

अहमदनगर: कर्ज न फेडल्यामुळे लिलावात काढण्यात आलेलं सोनं  बनावट निघाल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. येथील नगर अर्बन बँकेत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचाः आणीबाणीविरोधी लढाईत 58 गोंयकारांचं योगदान

पिशव्या उघडताच प्रकार समोर

हे सोनं बँकेच्या शेवगाव शाखेत गहाण ठेवण्यात आलं होतं. मात्र, कर्ज न फेडल्यामुळे हे सोनं लिलावात काढण्यात आलं होतं. नगर येथील मुख्य शाखेत सोन्याची लिलाव प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी हे सोनं पिशव्यांमधून बाहेर काढण्यात आलं. तेव्हा पहिल्या पाच पिशव्यांमध्ये बेंटेक्सचं सोनं असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. या प्रकारामुळे उपस्थित सभासद, बँक प्रशासक आणि लिलावात सहभागी झालेल्या सोनारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या सगळ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बँक आणि पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हा व्हिडिओ पहाः MHADEI ISSUE | म्हादईसाठी मूळ कर्नाटकी अधिकारी कशाला?

सोनं खरं की खोटं कसं ओळखाल?

सोनं खरेदी करण्यापूर्वी हे सोनं खरं आहे की बनावट आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हॉलमार्किंग आता अनिवार्य झाली आहे. याचा अर्थ आता आपल्याला खरं सोनं मिळेल. हॉलमार्किंग शुद्धतेची हमी आहे. परंतु, तरीही, जर एखादा सोनार आपली फसवणूक करीत असेल तर त्यास आपण स्वत:ला ओळखलं पाहिजे. खरं आणि बनावट सोन्यामध्ये फरक करणं सोपं आहे.

हेही वाचाः भारतावर आठ गडी राखून शानदार विजय

यासाठी तुम्हाला बादलीत पाणी घ्यावं लागेल. आता त्यात सोन्याचे दागिने घाला, दागदागिने बुडाले तर मग सोनं खरं आहे हे समजून घ्या, जर ते काही काळ तरंगले, तर समजून घ्या की सोनं बनावट आहे. खरं तर, सोनं कितीही हलकं असलं तरी ते नेहमी पाण्यात बुडतं.

हेही वाचाः धारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग

व्हिनेगरच्या मदतीने सोनं ओळखा

व्हिनेगरच्या मदतीने देखील आपण सोनं ओळखू शकता. सोन्याच्या दागिन्यांवर व्हिनेगरचे काही थेंब घाला, जर त्याचा रंग बदलला नाही तर ते खरं सोनं आहे. त्याच वेळी जर त्याचा रंग बदलला तर ते बनावट आहे. जर आपल्याला खरं सोनं तपासायचं असेल तर अॅसिड चाचणीद्वारे सहज जाणून घेऊ शकता. यासाठी, आपण पिनच्या सहाय्याने थोडंसं सोन्यावर स्क्रॅच करा आणि नंतर त्या स्क्रॅचवर नायट्रिक अॅसिडचा एक थेंब टाका. बनावट सोनं त्वरीत हिरवं होईल, तर वास्तविक सोन्यावर काही परिणाम होणार नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!