कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या संमिश्र डोसबाबत चाचण्यांचा परवानगी द्या

सेंट्रल ड्रग्ज सँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञांच्या समितीची शिफारस

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या कोरोनावरील लस एकत्र करून त्यांचे डोस देण्याबाबतच्या चाचण्या आणि अभ्यास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी शिफारस सेंट्रल ड्रग्ज सँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) या कोरोना लसीबाबतच्या तज्ज्ञांच्या समितीने गुरुवारी केली आहे. तसंच भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या नेसल वॅक्सिनच्या (नाकातून देण्यात येणारी लस) संमिश्र डोसबाबत अभ्यासाला परवानगी देण्याची शिफारसही करण्यात आली आहे. बायोलॉकीजल ईच्या मुलांना देण्यात येणाऱ्या लसीच्या चाचण्यांना परवानगी देण्याची शिफासरही करण्यात आली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) घेणार आहे.

हेही वाचाः जगात पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या लसींच्या कॉकटेलवर अभ्यास

सीएमसीला चौथ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी देण्याची शिफार

तामिळनाडूच्या वेल्लोरमधील क्रिश्चियन मेडिकल कॉलेजने (सीएमसी) कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या संमिश्र डोसबाबत अभ्यास करण्यासाठी परवानगी देण्याचा अर्ज केला आहे. त्यावर सीएमसीला याबाबतचा अभ्यास करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी शिफारस तज्ज्ञांच्या समितीने केली आहे. या समितीने सीएमसीला चौथ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी देण्याची शिफारसही केली आहे. त्यात 300 जणांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे संमिश्र डोस देत त्यावर अभ्यास करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या लसीचे डोस दिले तर त्याचे परिणाम काय होतात, ते किती प्रभावी आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यासातून लसीची टंचाई आणि दोन संमिश्र डोस देता येतील का, याबाबत अभ्यास होणार आहे.

हेही वाचाः महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी संशयितास अटक

शिफारसींबाबत डीसीजीआय अंतिम निर्णय घेणार

भारत बायोटेक नेजल वॅक्सिनवरही काम करत आहे. कोवॅक्सिची लस आणिन नेजल वॅक्सिनच्या संमिश्र डोसबाबत अभ्यास करण्याची परवानगी द्यावी, अशी शिफारसही समितीने केली आहे. समितीने मुलांना देण्यात येणाऱ्या बायोलॉजिकल ईच्या लसीबाबत चाचण्यांना परवानगी देण्याचीही शिफारस केली आहे. तसंच 18 वर्षांवरील नागरिकांवर सुरू असलेल्या चाचण्यांचा अहवालही समितीने मागवला आहे. मुलांना देण्यात येणाऱ्या या चौथ्या लसीबाबत चाचण्यांच्या परवनागीची शिफारस समितीने केली आहे. याआधी भारत बायोटेक, जायडस कॅडिला आणि नोवॅक्सिनबाबत चाचण्यांची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारसींबाबत डीसीजीआय अंतिम निर्णय घेणार आहे.

हेहीव वाचाः मायडा नदीत आढळला मृतदेह

हा व्हिडिओ पहाः Video | Assembly Update Live | सरकारने घाई गडबडीत संमत केलेल्या विधेयकांना सरदेसाई कोर्टात आव्हान देणार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!