EXAM | UPSC नागरी सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी UPSC पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 जून 2021 रोजी नियोजित होती. पण कोरोना संकटामुळे ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी होईल अशी घोषणा आयोगाने केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील शैक्षणिक वेळापत्रकाला मोठा फटका बसला आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या असून काही परीक्षा पुढेही ढकलण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचाः SET: सेटची परीक्षा 26 सप्टेंबरला; ‘या’ तारखेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलली परीक्षा
काही दिवसांपूर्वी राज्यातील MPSC परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सुरुवातीला विद्यार्थी या परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्यासाठी आग्रही होते. पण नंतर त्याच कालावधीत कोरोनाची दुसरी लाट राज्यात आणि देशात आली. दरम्यान, अनेक विद्यार्थी कोरोना लक्षणांसह आजारी असूनही परीक्षा बुडू नये यासाठी ती गोष्ट लपवत होते. तसंच लॉकडाऊनमुळे प्रवास करणंही त्यांना शक्य नसल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने घेतला होता.
Union Public Service Commission postpones the Civil Services (Preliminary) Examination 2021 to 10th October 2021
— ANI (@ANI) May 13, 2021
The examination was scheduled to be held on 27th June pic.twitter.com/h8v9k8zieo
परीक्षेच्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज
UPSC पूर्वपरीक्षा होण्यास आणखी दीड महिन्याचा अवधी असला तरी या परीक्षेस बसणाऱ्या परीक्षार्थींची संख्या त्या परीक्षा घेण्यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणा आणि कर्मचारी यांची संख्या मोठी असते. शिवाय, त्याच काळात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचाही अंदाज विविध संस्थांनी वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमीवर UPSC पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.