कर्नाटकच्या माहिती, जनसंपर्क आयुक्तपदी निंबाळकर

बुधवारपासून सांभाळणार नवीन पदभार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः एकेकाळी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुखपद समर्थपणे हाताळणारे आणि त्यानंतर कर्नाटकातील विविध वरिष्ठ पदांवर कार्य केलेले आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची कर्नाटकातील नव्या काँग्रेस सरकारने माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

बुधवारी स्वीकारणार पदभार

हेमंत निंबाळकर बुधवारी आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. सिनियर आयपीएस अधिकारी निंबाळकर हे बुधवारपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क खात्याचे आयुक्त म्हणून रूजू होणार आहेत.

सरकार आणि जनता यांच्यातील दुव्याचे कार्य माहिती व जनसंपर्क कार्यालय करते. जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचविणे आणि सरकारी योजना व कार्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून सरकारी योजनांची आमंलबजावणी व परिक्षण करण्याचे कार्य माहिती व जनसंपर्क कार्यालय करते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!