महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका, ११वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मिळालेल्या गुणांवर अकरावीत प्रवेश देण्याचे निर्देश

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाचा पेच कायम होता. या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला होता. अशाच पद्धतीची प्रवेश परीक्षा गोव्यातही घेण्याचं ठरलं होतं. दरम्यान, महाराष्ट्र सराकराला मुंबई हायकोर्टानं फटकारत इयत्ता अकरावीची सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द केली आहे.

सरकारला धक्का

इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असं हायकोर्टानं म्हटलंय. सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिलेली . तर, प्रवेश ११वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हा निर्णय म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारला मोठा धक्का मानला जातोय. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही. अशाप्रकारचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे.

हेही वाचा – Video | CHAIN SNATCHING | मोबाईल हिसकावण्याच्याही प्रकारात वाढ

दीड महिन्यात प्रक्रिया पूर्ण करा

महाराष्ट्रात आता अकरावीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार इयत्ता दहावीत जे गुण मिळालेले आहेत, त्या गुणांच्या आधारावरच अकरावीत प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर, 6 आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही हायकोर्टानं दिलेत. तसंच, कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणं हे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला असल्याचेही म्हटलंय.

हेही वाचा – Video | Fire | नवीन फ्रिज घेतला होता, शॉर्ट सर्किटमुळे मोठं नुकसान

सीईटी संदर्भात २५ मे रोजी राज्य सरकारने जो अध्यादेश काढला होता. तो उच्च न्यायालयाने रद्द केलाय. त्यात आधीच प्रवेश रखडलेले आहेत. त्यामुळे या निर्णयाला स्थिगिती देऊन, आम्ही आणखी लांबवत नाही. मुलांचे शैक्षणिक वर्ष आधीच बऱ्यापैकी वाया गेलेलं आहे, असं म्हणत राज्य सरकारची निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!