आठ महिन्याच्या चिमुरडीला HIV ची लागण; संक्रमित रक्त दिल्याची घटना

महाराष्ट्रातील अकोल्यातील घटना; रक्तपेढीतून एचआयव्ही संक्रमित रक्तं देण्यात आल्याचं समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः महाराष्ट्रातील अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आठ महिन्याच्या चिमुकल्या मुलीला रक्तपेढीतून एचआयव्ही संक्रमित रक्तं देण्यात आल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मुर्तिजापूर तालूक्यातील्या हिरपूर गावातील एका कुटुंबासोबत हा प्रकार घडला असून या प्रकरणात तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह रक्तपेढीने निर्दोष असल्याचं म्हणत अंग काढून घेतलं आहे. तर मुलीच्या पालकांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचाः सिद्धी नाईकची हत्याच झाली? वडिलांची पोलिसात नव्यानं तक्रार

असा घडला प्रकार

हिरपूर येथील चिमुकलीला पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी मुर्तिजापूर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश अवघाते यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. या उपचारादरम्यान, तिला रक्ताची आवश्यकता असल्यानं अकोल्यातील बीपी ठाकरे मेमोरियल रक्तपेढीतून रक्त देण्यात आलं. दवाखान्यातून या चिमुकलीला डिस्चार्ज दिल्यानंतरही या चिमुकलीची तब्येत सुधारत नव्हती. यामुळे तिला पुन्हा अमरावती येथे तिची रक्तचाचणी केल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्काच बसला

८ महिन्यांच्या चिमुकलीची रक्तचाचणी केल्यानंतर आलेल्या अहवालात या चिमुकलीला ‘एड्स’ची लागण झाल्याचं समोर आलं. तसंच यानंतर तिच्या आई-वडिलांची एड्स चाचणी निगेटीव्ह आली. या घटनेनंतर करण्यात आलेल्या तपासात या चिमुकलीला अकोल्याच्या रक्तपेढीतून मिळालेलं रक्त ‘एचआयव्ही’ संक्रमित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकारात अवघाते हॉस्पिटलने रक्तपेढीतून आणलेलं रक्त फक्त चिमुकलीला दिल्याचं म्हणत हात वर केले आहेत. तर रक्तपेढीने हा दुर्दैवी प्रकार ‘विंडो पिरियड’ या तांत्रिक गोष्टीमुळे झाल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याचं सांगितलं आहे.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!