नरदेव पाहिजे पण कोव्हिशिल्ड लस घेतलेलाच…

लग्नाच्या जाहिरातीवरही लसीकरणाचा इफेक्ट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः तुम्ही वेगवेगळ्या स्वरुपाच्या लग्नाच्या जाहिराती आतापर्यंत पाहिलेल्या असतील. म्हणजे अमुक रंगाचा, याच जातीचा, त्या कुळाचा, एवढ्या उंचीचा, एवढं तेवढं शिक्षण असलेला, पगाराचा, परदेशात सेटल असलेला वगैरे वगैरे पण कोविशिल्डचाच डोस घेतलेला नवरा मुलगा हवाय अशी जाहिरात तुम्ही वाचली तर काय म्हणाल? हसाल, कदाचित वेड्यातही काढाल. पण काहीही असो, वास्तव तर हेच आहे की, आता लग्नाच्या जाहिरातीतही लसीकरण घुसलेलं आहे आणि वधू पक्षाला तिनं जी लस घेतलेली आहे त्याच टाईपची लस घेतलेला वर हवा आहे.

काय आहे जाहिरातीत?

नरदेव पाहिजे पण कोव्हिशिल्ड लस घेतलेलाच…

एका इंग्रजी वर्तमान पत्रात ही जाहिरात प्रकाशित केली गेली आहे. 4 जून शुक्रवारी ती छापली गेली आहे. सध्या ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झाली आहे. या जाहिरात वधूपक्षानं दिलेली आहे. त्यात ते असं सांगतात, रोमन कॅथोलिक मुलगी आहे, तिची 24/5’4″ वय- उंची आहे. तिनं गणितात M.Sc केलेलं आहे. सेल्फ एम्पलॉईड आहे. आणि पुढं लिहिलंय, कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

हेही वाचाः राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना केंद्राकडून जाहीर

अशा वधूला जो नवरा मुलगा हवाय तो कसा हवा तर असा : रोमन कॅथोलिक असावा, त्याचं वय 28 ते 30 वर्ष हवं. पदवीधर, स्वतंत्रवृत्तीचा, कुणावर अवलंबुन नसलेला, धैर्यवान, विनोदी, पुस्तकं वाचणारा असा असावा. त्याच्याच पुढच्या ओळीत लिहीलंय, की त्यानं कोविशिल्डचा डोस घेतलेला असावा आणि तेही दोन्ही. म्हणजेच वधूनं जसे कोविशिल्डचेच दोन डोस घेतलेले आहेत तसंच भविष्यातल्या नवऱ्या मुलानेही घ्यावेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!