फोडणी महागली! इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती भिडल्या गगनाला

दोन वर्षांत खाद्यतेलात 77 टक्के दरवाढ; देशांतर्गत मागणी-पुरवठ्यात 56 टक्के तफावत

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: देशभरात इंधन दरवाढीमुळे सर्वसामन्य हैराण झाले आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक खाद्यतेलाच्या किंमतीत  सातत्याने वाढ होत आहे. काही महिन्यापूर्वी 500 ते 600 रुपये दराने मिळणारा पाच लिटर तेलाचा डबा हा आता हजार रुपये किंमतीने विकला जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

हेही वाचाः Income Tax लाँच करणार नवीन पोर्टल

सहा प्रकारच्या तेलाची रिटेल किंमत 11 वर्षांत प्रथमच सर्वाधिक

घराघरात दैनंदिन वापरातला अविभाज्य घटक म्हणून तेल आणि तूप याकडे पाहिलं जातं. देवासमोरची दिवाबत्ती करण्यापासून ते दररोजचा स्वयंपाक करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी तेलाची गरज भासते. पण कोरोना काळात घरगुती वापरातील तेलाचा अक्षरक्षः भडका उडाला आहे. शेंगदाणा तेल, राईचे तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल आणि पामतेल या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. गेल्या मे महिन्यात या सहा प्रकारच्या तेलाची रिटेल किंमत 11 वर्षांत प्रथमच सर्वाधिक आहे. एकीकडे कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

हेही वाचाः कर्नाटकात पुन्हा राजकीय नाटकं! मुख्यमंत्री बदलले जाण्याच्या चर्चांना उधाण

खाद्यतेलाच्या किंमतीत अचानक वाढ का?

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्पादक देशांमधून खाद्यतेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भावातही खाद्यतेलाची मागणी कमी झालेली नाही. मागणी आणि पुरवठा यातील फरक वाढल्या या किमतीत वाढ होत आहे. अमेरिका आणि ब्राझीलसह काही देश खाद्यतेलाचा वापर बायोफ्युअल करण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे तेलाचा तुटवडा जाणवत आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचाः दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट

60 टक्के खाद्यतेल बाहेरील देशांतून आयात

देशात होणारे खाद्यतेलाचे उत्पादन पुरेसे नाही. भारतात एकूण गरजेच्या केवळ 40 टक्के खाद्यतेलाचे उत्पादन होते. मागणी आणि पुरवठ्यातील दरी भरून काढण्यासाठी जवळपास 60 टक्के खाद्यतेल बाहेरील देशांतून आयात करावं लागतं. तसंच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे देशातील तेलाच्या दरात वाढ झाली आहे.

हेही वाचाः भारतीय तटरक्षक दलाने गोवा किनाऱ्यावर पुरवली तातडीची वैद्यकीय मदत

वर्षभरात तेलाच्या दर किती वाढला?

देशातील विविध राज्यांत जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरले जाते. त्यानुसार, कन्झ्युमर अफेयर्स विभाग सहा प्रकारच्या तेलाचे दर निश्चित करतात. यात शेंगदाणा तेल, राईचे तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल आणि पामतेलाचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात या सर्व प्रकारच्या तेलाच्या दरात 20 ते 60 टक्क्यांची वाढ झाली आहे.

हेही वाचाः आजपासून १५ वर्षांपर्यंतच्या पालकांनाही लसीकरणात प्राधान्य

सद्यस्थितीत तेलाचे दर काय

तेलाचे प्रकारदर (लिटरप्रमाणे)
सोयाबीन तेल196
सूर्यफूल तेल200
शेंगदाणा तेल200
राईचे तेल 180
पामतेल160
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!