भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला ईशान्य भारत

म्यानमार-भारत सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप; २८ एप्रिल रोजी राज्याला ६.४ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः म्यानमार-भारत सीमेजवळच्या भागाला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. यासंदर्भातील माहिती युरोपीय-भूमध्य भूकंप केंद्राने यासंदर्भातील माहिती दिलीय. समोर आलेल्या माहितीनुसार बांगलादेशच्या चटगावपासून १७५ किमी पूर्वेला ६.३ रिश्टर स्केलचा मोठा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचे झटके भारतामधील पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामपर्यंत जाणवले. तसेच शुक्रवारी ईशान्येकडील राज्यांपैकी एक असणाऱ्या मिझोरममध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.

या भूकंपामध्ये कोणीही जखमी झालेले नाही

एएनआय वृत्तसंस्थेने सीएमसीएच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दुसरीकडे नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने देलेल्या माहितीनुसार मिझोरमच्या थेनवॉलपासून ७३ किमी दूर दक्षिण-पूर्वमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आलाय.

४.१ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

आसाममधील सर्वात मोठं शहर असणाऱ्या गुवहाटीसहीत राज्यातील इतर काही भागांमध्ये शनिवारी दुपारी ४.१ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र कामरुप जिल्ह्यामध्ये जमीनीखाली १० किमीवर होते. रात्री १ वाजून १२ मिनिटांनी भूकंपाचे हे झटके जाणवले. गुवहाटी आणि आजूबाजूच्या परिसारामध्ये हा भूकंप प्राकर्षाने जाणवला.

ईशान्य भारतामधील हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रापैकी एक

या भूकंपामध्ये कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. ईशान्य भारतामधील हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रापैकी आहे. २८ एप्रिल रोजी राज्याला ६.४ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!