कोल्हापुरात सकाळी ९.१६ वाजता जाणवले भूकंपाचे झटके!

३.३ रिश्टर स्केल इतकी तीव्रता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : वातावरणातील बदलाचा परिणाम कधी वादळ, कधी अकाली पाऊस असा होताना पाहायला मिळत असतानाच आता गोव्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर भूकंपाचे झटके जाणवले आहेत. गोव्या शेजारी असलेल्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूरमध्ये रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याची बातमी एएनआय वृत्त संस्थेनं दिली आहे.

कधी जाणावले?

कोल्हापुरात रविवारी सकाळी ९.१६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद करण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता ही ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. National Center for Seismologyने या संदर्भातली माहिती जारी केली आहे.

हेही वाचा – धक्कादायक : लसीमुळं नष्ट नव्हे, अधिक शक्तीशाली होतोय कोरोना विषाणू !

आणखी कुठे धक्के जाणावले?

दरम्यान, पूर्वेकडील राज्य असणाऱ्या मणिपूरमध्येही रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मणिपूरमध्ये सकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने ही माहिती दिली असून मणिपुरातील भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. दरम्यान, कोल्हापुरासोबत मणिपुरातील भूकंपाच्या धक्क्यात अजूनतरी कोणत्याही प्रकारी जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान भूकंपाच्या वृत्तामुळे एकूणच कोल्हापूरसोबत मणिपूरमध्ये लोकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!