पंतप्रधान मोदींनी लाँच केले e-RUPI

अडथळ्यांशिवाय घेता येईल अनेक योजनांचा फायदा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-व्हाउचर-आधारित डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रूपी लाँच केले आहे. e-RUPI हे प्रीपेड ई-व्हाउचर आहे, जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने विकसित केले आहे. याद्वारे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट केले जाईल. सरकारच्या मते, याद्वारे योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्यास मदत होईल. ही सेवा वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. याचे फायदे नेमके काय आहेत. जाणून घेऊ या.

हेही वाचाः मोठी बातमी! यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही

‘हे’ आहेत ९ फायदे

1) ही कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पद्धत आहे.

2) ही सेवा पैसे देणारा आणि प्राप्तकर्ता यांना जोडते.

3) यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत जाईल. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल.

4) ही एक QR कोड किंवा SMS स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे. जे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर थेट पाठवले जाईल.

5) या वन टाईम पेमेंट सर्विसमध्ये युजर्स कोणत्याही कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंगशिवाय व्हाउचर REEDEM करू शकतील.

6) e-RUPI द्वारे, सरकारी योजनांशी संबंधित विभाग किंवा संस्था कोणत्याही फिजिकल कॉन्टॅक्टशिवाय लाभार्थी आणि सर्विस प्रोवाइडरशी थेट जोडल्या जातील.

7)  ई-रुपी हे देखील सुनिश्चित करते की व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस प्रोव्हाडरला पैसे दिले जातील.

8) प्री-पेड असल्याने, सेवा पुरवणाऱ्याला कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय वेळेवर पैसे देण्याचे आश्वासन ई-रुपी देते.

9) या डिजिटल व्हाउचरचा उपयोग खाजगी क्षेत्र देखील आपल्या कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचा भाग म्हणून घेऊ शकते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!