कामाची बातमी! सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे वाहन चालक आणि मालकांना मोठा दिलासा

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : केंद्र सरकारानं एक महत्त्वाचा निर्णय घेत अनेकांना दिलासा आहे. हा दिलासा आहे गाड्यांच्या कागरपत्रांसंबंधी. वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि फिटनेस प्रमाणपत्र अशा अनेक महत्त्वाच्या वाहन कागदपत्रांवर केंद्र सरकारने पुन्हा मोठा दिलासा दिला आहे. या कागदपत्रांची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आता कोणतीही व्यक्ती ३१ मार्च २०२१ पर्यंत अशी कागदपत्रे वापरू शकते, ज्यांची वैधता १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे.
लॉकडाऊनच्या काळात ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), आरसी (RC), परमीट (Permit Renewal) इत्यादींची व्हॅलिडीटी संपली असेल तर आता काळजी करायचं कारण नाही. कारण ड्रायव्हींग लायसन्स, आरसी, परमीट नुतनीकरणाची तारीख ३१ मार्च २०२१पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळालाय.
पुन्हा वाढवली मुदत
गाड्यांच्या कागदपत्रांबाबत ही मुदत चौथ्यांदा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कोरोना साथीमुळे चौथ्यांदा आपली वैधता वाढविली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये सरकारने ही वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविली होती.केंद्राच्या निर्णयामुळे नागरिकांना सुरक्षित शारीरिक अंतर राखत वाहतुकीसंदर्भातील सेवा आता मिळू शकेल.
अनेकांना ऑनलाईन अर्ज केल्यानंतर महिन्यानंतरची तारीख मिळाली होती. हा सर्व त्रास लक्षात घेत केंद्राकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ही मुदत तीन महिन्यांनी पुन्हा वाढविली आहे. केंद्र सरकारच्या नव्या निय़मांनुसार जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तर ५००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वैधता संपलेले ड्रायव्हिंग लायसन म्हणजेही विना लायसन मानण्यात येते. 1 जानेवारीपासून लागू होणाऱ्या नव्या वाहतूक नियमांतूनही सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यताय.
फास्ट टॅगची सक्ती कायम
देशातील प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून फास्ट टॅगची सक्ती करण्यात आली आहे. तशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. फास्ट टॅगमुळे टोलच्या रांगेतून मुक्ती मिळणार आहे. देशातील प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून फास्टटॅद बंधनकारक करण्यात आलाय. FASTAGची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचणार आहे.