DRDO ने बनवलेल्या 2DG औषधाची किंमत ठरली

डॉ. रेड्डीजकडून घोषणा; 990 रुपयांना मिळणार औषध

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: डीआरडीओ (DRDO) बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज 2-deoxy-D-glucose (2-DG) च्या एका पॅकेटची किंमत निश्चित करण्यात आली आहे. डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी संयुक्तपणे औषधाची निर्मिती करणार आहेत. 2-DG हे औषध 990 रुपयांना मिळणार आहे. मात्र, फार्मा कंपनी, सरकारी रुग्णालयं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना सवलतीच्या दरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  2-DG औषधाचे 10 हजार पॅकेटस डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं उत्पादित केले आहेत. भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने डीआरडीओ (DRDO)बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज 2-deoxy-D-glucose (2-DG) च्या आपत्कालीन वापरासाठी 8 मे रोजी मंजुरी दिली होती.

हेही वाचाः राज्याचा कोविड पॉझिटिव्हीटी रेट होतोय कमीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

8 मे रोजी डीजीसीआयची परवानगी

भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने डीआरडीओ (DRDO)बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज 2-deoxy-D-glucose (2-DG) च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. डीआरडीओने 2 डेक्सोय डी ग्लुकोजचं उत्पादन डॉ. रेड्डीच्या सहकार्यानं सुरू केलं आहे. त्याची किंमत 990 रुपये निश्चित करण्यात आली आहे. आता हे औषध केंद्र आणि राज्य सरकारांना किती रुपयांना मिळणार हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचाः गोमेकॉत झालेल्या मृत्यूंना मुख्यमंत्री, आरोग्यमंत्रीच जबाबदार

ऑक्सिजनचा वापर कमी होणार

2 DG औषध कोरोना रुग्णाला दिल्यास ते त्याच्या पेशीतील संसर्गित पेशींवर काम करते. यामुळे रुग्ण रुग्णालयात थांबण्याचा कालावधी कमी होतो. परिणामी रुग्णालयातील यंत्रणेवरील ताण कमी होतो. यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील कमी होते.

हेही वाचाः CRIME | चरस बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांकडून एकाला अटक

रुग्ण बरे होण्यासाठी लागणार वेळ कमी

डीआरडीओनं जारी केलेल्या माहितीनुसार 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि 2 डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास 2.5 दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आलेय.

हेही वाचाः पंतप्रधान मोदी आणि सरकारला कोरोना समजलाच नाही !

2 डेक्सोय डी ग्लुकोज कसं घ्यायचं?

डीआडीओनं विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरुपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!