वादग्रस्त फेसबूक लाईव्हच्या 10 दिवसांनंतर डॉ शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

डॉ शीतल आमटे-करजगींच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

चंद्रपूर : डॉ शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. आनंदवन येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. चंद्रपुरात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. डॉक्टर शीतल आमटे-करजगी या डॉक्टर विकास आमटे आणि डॉ भारती भारती आमटे यांच्या कन्या आहेत. त्यांच्या आत्महत्येने सगळ्यांना धक्का बसला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोजी सेवा समितीच्या डॉ शीतल आमटे-करजगी या सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

10 दिवसांपूर्वीच वादग्रस्त खुलासा

20 नोव्हेंबरला शीतल यांनी फेसबूक लाईव्ह केलं होतं. या फेसबूक लाईव्हमध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आक्षेप घेतला होता. विश्वस्तांवरही त्यांनी सवाल उपस्थित केले होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अर्ध्या तासातच हे फेसबूक लाईव्ह त्यांनी डीलीट केलं होतं. शीतल यांनी आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये कौस्तुभ आमटे, काका डॉ प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप केलेले. आमटे कुटुंबीयांना पक्षक काढून शीतल यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला.

त्यांचं सर्व भाष्य तत्थहीन असून त्या नैराश्याविरोधात लढत होत्या असं आमटे कुटुंबीयांनी म्हटलं होतं. दरम्यान, आत्महत्या करण्याआधी त्यांनी ट्वीटरवर वॉर आणि पीस असं लिहीत एक चित्र शेअर केलं होतं. आपल्या मनातील घालमेल सांगण्याचा त्यांनी या चित्रातून प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!