डॉ. बी. बी. गायतोंडे यांचं निधन

जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार; बांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार तथा प्रतिथयश डॉ. भिकाजी बळवंत गायतोंडे (९४) यांचं रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बांदा येथील राहत्या घरी निधन झालं.

हेही वाचाः Corona +ve | आमदार बाबूश यांना कोरोनाची लागण

रुग्णसेवा, जनसेवा, शैक्षणिक कार्यासाठी वेचलं आयुष्य

त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य रुग्णसेवा, जनसेवा व शैक्षणिक कार्यासाठी व्यतीत केलं. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झालीये. बांद्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाची स्थापना केली. पानवळ येथील गोगटे – वाळके महाविद्यालयाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. कॉलेजच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकले.

हेही वाचाः भीषण अपघात! सावंतवाडीचे नगराध्यक्ष थोडक्यात बचावले…

विविध पदांवर कार्यरत

सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे ते माजी चेअरमन होते. फाऊंडेशन फॉर एचसीए या संस्थेचे ते संस्थापक चेअरमन होते.

हेही वाचाः BREAKING | अग्नितांडव! पुणे कॅम्पमधील दुकानांचा कोळसा

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!