दोडामार्गला वादळी पावसाने झोडपले

वीज, नेटवर्क गायब; जनजीवन विस्कळीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्गः दोडामार्ग तालुक्‍याला रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने झोडपून काढलं. सोसाट्याचा वाराही सुटल्याने जनजीवन विस्कळीत झालं. बाजारपेठेसह परिसरातील रस्त्यांना तळ्याचं रूप आलंय. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

हेही वाचाः राज्यातील पेट्रोलच्या दरांनी अखेर शंभरी गाठलीच!

कॉजवे पाण्याखाली गेला

तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब भरले आहेत. याचदरम्यान भेडशीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप चालकाची गाडी या पाण्यात अडकली. पाणी गाडीच्या बॉनेटपर्यंत गेल्याने गाडी पाण्यातच अडकून पडली. दोडामार्ग-तिलारी रस्त्यावर भेडशी खालचा बाजार येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं कॉजवे पाण्याखाली गेला.

हेही वाचाः पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आता 24 तास ऑनलाईन दर्शन

रस्त्यांचं झालं तळं

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे; मात्र त्यापूर्वी दोडामार्गमध्ये पावसाचा मागमूस नव्हता; पण रविवारपासून पावसाने तालुक्‍याला झोडपून काढलं. सोसाट्याचा वारा सुटला होता. हवेत गारवाही होता. गटार व्यवस्था पावसामुळे कोलमडल्याने रस्त्यांचं तळं झालं होतं. येथील बाजारपेठेतील रस्ते आणि त्यातील खड्डे साचलेल्या पाण्यामुळे दिसत नव्हते. त्यामुळे वाहनचालकांची त्रेधा उडत होती.

हेही वाचाः “आमिर खानसारख्या लोकांमुळे देशातील लोकसंख्येचा समतोल ढासळला !”

वीज, नेटवर्क गायब

तालुक्‍यात रविवारपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवस आणि रात्रभर विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. मोबाईलचा नेटवर्कही सुरळीत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!