21 जूनपासून केंद्राकडून राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांना लसींचं वितरण

केंद्रीय औषध प्रयोगशाळेनं मान्यता दिलेल्या लसींपैकी ७५ टक्के लसी देण्यास करणार सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः केंद्रीय औषध प्रयोगशाळेनं मान्यता दिलेल्या लसींपैकी ७५ टक्के लसी, उद्यापासून म्हणजेच 21 जूनपासून केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत केल्या जाणार आहेत. लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वच वयोगटांसाठी राज्यांना या लसींचा वापर करता येणार आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय.

हेही वाचाः शिवसेना उत्तर गोवा जिल्हा समितीतर्फे गिरी महामार्गावर वृक्षारोपण

सध्या केंद्राच्या वतीनं ५० टक्के लसी राज्यांना केल्या जात होत्या वितरीत

सध्या केंद्राच्या वतीनं ५० टक्के लसी राज्यांना वितरीत केल्या जात होत्या. मात्र १८ वर्षांपुढच्या सगळ्याच नागरिकांना केंद्र सरकारच्या वतीनंच मोफत लस पुरवठा केला जाईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याच महिन्याच्या ७ तारखेला केली होती.

हेही वाचाः गोंयकारांना स्वतःच्या मालकीचे घर घेण्यापासून भाजप ठेवतेय वंचित

केंद्राने लसींचं प्रमाण वाढवलं

त्यानुसार केंद्राकडून राज्यांना पुरवल्या जाणाऱ्या लसींचं प्रमाण वाढवलं आहे. यामुळे यापुढे लसी विकत घेण्यासाठी राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना खर्च करावा लागणार नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!