कोरोनामुळे मधुमेहींना होऊ शकतो ‘म्युकर मायकोसिस’

उपचारादरम्यान फंगल इन्फेक्शन; काहींची दृष्टी गेली, तर काहींचा जीव; अहमदाबादमध्ये अनेक दगावले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोनाने संक्रमित झालेले मधुमेहाचे रूण उपचारादरम्यान एका बुरशीचे (फंगस इन्फेक्शन) बळी ठरत आहेत. काही उदाहरणांमध्ये या रुग्णांच्या डोळ्याची दृष्टी, तर काही उदाहरणांमध्ये जीवच गेल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचाः दोन डोसादरम्यानचं अंतर वाढवणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकर मायकोसिसचं प्रामण वाढलं

मधुमेहाच्या या रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर म्युकर मायकोसिस नावाचा आजार जडला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अशी उदाहरणे फार कमी प्रमाणात आढळली. पण दुसऱ्या लाटेत त्यांचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेलं आहे.

हेही वाचाः १३ आमदारांची कारकीर्द अनुभवणाऱ्या आजींचं निधन !

जयपूर, अहमदाबादमध्ये दिसली उदाहरणं

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये गेल्या 15 दिवसांत अशी 52 उदाहरणं समोर आली आहेत. सरकारी रुग्णालयांचे हे आकडे असून, प्रत्यक्षात अशा रुग्णांची संख्या मोठी आहे. अहमदाबाद (गुजरात) येथील शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयातील अधिष्ठाता गिरीश परमार यांनी सांगितलं, की म्युकर मायकोसिससारख्या आजाराचा धोका कोरोना जडलेल्या आणि स्टेराइड घेतलेल्या मधुमेहाच्या रुग्णांना मोठा आहे. जिल्हा रुणालात अशा 80 पैकी 60 रुग्णांना हा आजार जडला. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला, तर तिघांची दृष्टी कायमची गेली.

काय आहे म्युकर मायकोसिस?

डोळ्यांच्या नसांजवळ बुरशीजमा होते. ‘सेंट्रल रेटीनल आर्टरी’ला होणारा रक्ताचा पुरवठा या बुरशीमुळे बंद होतो आणि डोळ्यांची दृष्टी कायमस्वरूपी जाते.

हेही वाचाः फेसबूक कमेंटची मुख्यमंत्र्यांकडून दखल

म्युकर मायकोसिस – कोरोनाचा संबंध काय?

कोरोनामध्ये उपचारार्थ दिल्या जाणाऱ्या स्टेरॉईड ड्रग्जमुळे रुग्णाची रोगप्रतिबंधक क्षमता आणखीच खालावते. अशात औषधांचा साईड इफेक्ट होऊ लागतो आणि त्यामुळे रुग्णाला म्यूकर मायकोसिस हा आजार जडतो.

हेही वाचाः CORONA UPDATE | शुक्रवारी देशातील कोरोना बाधितांचा आकडा चार लाखाच्या पार

म्युकर मायकोसिसची लक्षणे काय?

नाक कोरडं पडतं. नाकाचं आतील आवरण कोरडं पडतं आणि पुढे सुन्न होतं. चेहऱ्याची तसंच तळपायाची त्वचा सुन्न होते. चेहऱ्यावर सूज येते आणि दात हिरड्यांपासून सैल होऊ लागतात.

हेही वाचाः कंगना रनौतला कोरोनाची लागण

म्युकर मायकोसिसवर उपचार काय?

फंगस (बुरशी) आणि फंगस इन्फेक्शन थांबविण्यसाठी ‘लायपॉसॉमल अॅम्फॉटरिसिन’ हे एकमेव इंजेक्शन असून ते 5 हजार रुपयांत मिळतं. रुग्णाला 6 इंजेक्शन्स द्यावे लागतात. इन्फेक्शन वाढलं तर शस्त्रक्रियेअंती नाक आणि डोळ्यांच्या दरम्यानचा गळालेला भाग काढला जातो. ही शस्त्रक्रिया जटिल असते.

हेही वाचाः युवक काँग्रेस धावले कोविड रुग्णांच्या मदतीला

तर रुग्णाला वाचविणे अशक्य?

सात ते आठ दिवसांत उपचार झाला नाही आणि बुरशी काढण्यात आली नाही तर मेंदूपर्यंत तिचा प्रादुर्भाव पसरतो. यानंतर रुग्णाला वाचविणं जवळपास अशक्य होतं.

हेही वाचाः संगीतकार वनराज भाटिया कालवश

रुग्णाचा बचाव कसा करावा?

किमान 4-5 दिवसांनंतर मधुमेहाच्या रुग्णाच फिडबॅक घेत राहावं. कोरोना उपचारासाठी त्याला संतुलित प्रमाणातच स्टेरॉईड द्यायला हवं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!