ड्रग्स कनेक्शन! दीपिका पदुकोन मोठे खुलासे करण्याची शक्यता

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
मुंबई : नार्कोटीक्स डीपार्टमेन्टकडून अभिनेत्री दीपिका पदुकोनची कसून चौकशी केली जाते आहे. दीपिकासोबत अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून काय नवी माहिती NCBच्या हाती लागते, हे पाहणं महत्त्वाचंय. बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनवरुन अनेक बडे सेलिब्रिटी NCBच्या रडारवर आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शन सामान्यांसमोर आलंय. रिया चक्रवर्तीचीही NCBसोबत ईडी, सीबीआय आणि मुंबई पोलिासांनीही कसून चौकशी केली होती. त्यानंतर आता दीपिका पदुकोनच्या चौकशीनंतर नेमकं काय सत्य समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. स्पेशल इनवेस्टीगेशन टीमकडून करण्यात येणाऱ्या चौकशीतून नवनवे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. एसआयटी चौकशीला दीपिकासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खानही सामोऱ्या जाणार आहेत. दीपिकाच्या चौकशीच्या निमित्तानं माध्यमांनीही मोठी गर्दी केली होती. त्यामुळे एसआयटीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलिस फोजफाटाही तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, रकुल प्रीत सिंहचीही एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आली. चार तास तब्बल रकुल प्रीतची चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर आता दीपिकाची चौकशी केली जाते आहे. येत्या काळात अनेक दिग्गज बॉलिवूज सेलिब्रेटींना एनसीबीच्या चौकशीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. आता या संपूर्ण प्रकरणात आणखी कुणाकुणाचं नाव समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचंय.