देशात गाढवांच्या संख्येत घट

६१.२३ टक्के घट; ब्रुक इंडिया संस्थेचा सर्व्हे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : देशात गेल्या काही दिवसात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची माहिती ब्रुक इंडियाने (BI) संस्थेने केलेल्या सर्व्हेतून उघड झाली आहे. देशभरात गाढवांच्या संख्येत एकूण ६१.२३ टक्के घट झाली आहे. संस्थेने सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला हा अहवाल दिला आहे.

एका व्यक्तीने महिन्याला २०० गाढवं खरेदी करण्यासाठी साधला होता संपर्क

बीआय टीमने बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या अंतर्गत भागांना भेट दिल्या. २०१२ आणि २०१९ पशुगणनेत या कालावधीत गाढवांच्या संख्येत एकूण ६१.२३ टक्के घट दिसून आली. घट होण्याचे कारण जाणण्यासाठी आम्ही अनेक गाढव मालक, पशु व्यापारी, पशु मेळ्यांचे आयोजक आणि राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी बोललो”, असंही शरत के वर्मा यांनी पुढे सांगितलं. स्थानिक गाढव व्यापाऱ्याचं संदर्भ देत वर्मा म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी चीनमधील एका व्यक्तीने महिन्याला २०० गाढवं खरेदी करण्यासाठी संपर्क साधला होता. गाढवाचे कातडे हवं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.” जिवंत गाढवं, चामडं आणि मांस याची निर्यात बेकायदेशीर सहज होत असल्याचंही त्यांनी पुढे नमूद केलं.

संख्येत ६१.२३ टक्क्यांची घट

आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या काही भागांमध्ये गाढवांची हत्या केली जात असल्याचं समोर आलं आहे. २०१२ च्या लाइव्ह स्टॉक्सच्या गणनेनुसार भारत जवळपास ०.३२ दशलक्ष गाढवांची संख्या होती. ती २०१९ च्या पशुधन गणनेनुसार केवळ ०.१२ दशलक्ष इतकी कमी झाली.”, असं सर्व्हे करणाऱ्या ब्रुक इंडिया संस्थेचे सदस्य शरत के वर्मा यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.”

जगभरात गाढवांची संख्या कमी

“ जगभरात गाढवांची संख्या कमी होण्यासाठी चीनला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले जात आहे. ‘इजियाओ’ हे पारंपरिक चिनी औषध बनवण्यासाठी गाढवाच्या चामड्याचा वापर केला जातो. हे आयुष्य आणि सेक्स ड्राइव्ह वाढवते आणि इतर आजार बरे करण्यासाठी उपयुक्त असल्याचं समज आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

गाढवाचे मांस खाल्ल्याने आरोग्याला फायदा असा समज

देशातील काही भागांमध्ये गाढवाचे मांस खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो असा समज असल्याने मांसाला मागणी आहे. या कारणामुळेही संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) सांगण्यानुसार गाढवाचे मांस हे खाण्यासाठी वापरु शकत नाही. गाढवाचे मांस खाणे कायद्यानुसार चुकीचं आहे. याचसंदर्भात आता आंध्र प्रदेशमध्ये तपास सुरु असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!