कोकण रेल्वेनं केला प्रवास ; उतरताच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन ; कोरोना टेस्ट निघाली पॉझिटीव्ह

सिंधुदुर्ग तालुक्यातील कुडाळ येथील घटना; कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासनासह रेल्वे प्रशासन गडबडलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

सावंतवाडीः कोकण रेल्वेच्या दादर-सावंतवाडी गाडीने प्रवास करणाऱ्या कुडाळ येथील प्रवाशाचं कुडाळ रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. शनिवारी सकाळी ही घटना घडली. या प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आरोग्य प्रशासनाकडून कोविड टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य प्रशासनासह रेल्वे प्रशासनही गडबडलं.

प्रशासनाचा सावळा गोंधळ

विशेष म्हणजे हा प्रवासी दादर-सावंतवाडी गाडीतून आलेला असतानाही त्या आधी आलेल्या हॉलिडे स्पेशल गाडीतील प्रवाशांनाही घरी क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देत त्यांची टेस्ट करणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या सावळ्या गोंधळाचा फटका इतर गाड्यांमधून शनिवारी प्रवास करून आलेल्या प्रवाशांना बसला आहे. त्यांना फुकटचा मनस्ताप होत असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!