अजब गजब ! टोलचे पैसे वाचवण्यासाठी असाही एक जुगाड

मोठ्या गाडीला छोट्या गाडीचा FasTag; राजस्थानमधील प्रकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात 15 फेब्रुवारीपासून चारचाकी वाहनांपुढील सर्व लहान मोठ्या वाहनांना फास्टॅग (Fastag) कंपल्सरी केलाय. यामुळे जवळपास सर्व टोल प्लाझांवर रोख रक्कम घेणं बंद केलं आहे. जर एखाद्या वाहनाला फास्टॅग नसेल तर त्याच्याकडून दुप्पट टोल रोखीने वसूल केला जातो. आजही अनेक ठिकाणी फास्टॅग स्कॅन नाही झाला, ब्लॅकलिस्ट दाखवून लुटायचे धंदे सुरू आहेत. पुण्याजवळच्या साताऱ्याकडे जातानाच्या टोलनाक्यावर तर बनावट पावत्या देऊन लूटालूट सुरू होती. आता वाहनचालकांनीही टोल वाचविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढल्यात.

हेही वाचाःVideo | थरारक | अडीच तासापर्यंत सुरू होते सिलिंडरचे स्फोट

टोलचे पैसे वाचवण्याची अजब क्ल्युप्ती…

प्रकरण राजस्थानचे आहे. जोधपुर-जैसलमेर हायवेवरील टोलनाक्यावर हुश्शार लोकांनी नवीन जुगाड शोधून काढला आहे. तो पाहून अनेकजण हबकलेत. फास्टॅगला पैसे कमी कापले जावेत म्हणून अनेकांनी टेम्पो, ट्रक, बससारख्या वाहनांना कार-जीपचे फास्टॅग लावलेत. हा जुगाड गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. यामुळे टोल नाक्यावर कारच्या पैशांमध्ये बस, ट्रक, टेम्पो निघून जात होते. टोल नाक्यावरील पैशांचे कलेक्शन कमी झाल्याने टोल प्लाजा मॅनेजर सुरेश शर्मांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तसंच वाहनांची तपासणी सुरू केली तेव्हा हा प्रकार उघड झालाय.

हेही वाचाः साळ गडे उत्सवाबाबत सरकारी यंत्रणेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

बसवर कार कॅटॅगरीचा फास्टॅग

एका बसवर कार कॅटॅगरीचा फास्टॅग लावलेला होता. यामुळे बस गेली तरीही कारचा 90 रुपये टोल कापला जात होता. हा टॅग एका बोलेरो कारचा होता. अशाच प्रकारे अनेक वाहने या टोलनाक्यावरून ये-जा करत होती आणि ही नेहमी ये-जा करणारी वाहने होती. तरीही कोणाला यावर संशय आला नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
वाहनांचे ड्रायव्हर फास्टॅग काचेवर न लावता खिशात ठेवत होते. टोल नाक्यावर येताच ते पुढे करायचे यामुळे त्यांचा फास्टॅग स्कॅन व्हायचा आणि गेट खुलं व्हायचं. अशाप्रकारे ही वाहने तीन टोल नाक्यांवरून जायची ज्याचा टोल मोठ्या वाहनांसाठी 900 रुपये होता तो 270 रुपये वसूल व्हायचा.

हेही वाचाः RESCUE | अखेर आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ‘त्या’ नागाला मिळाले जीवदान

स्थानिक दाखविण्यासाठी….

स्थानिकांना टोलमाफी करण्य़ात आलेली आहे. यामुळे अनेकांनी बनावट आधार कार्ड बनवून घेतलंय. हे आधारकार्ड दाखविल्यावर स्थानिक म्हणून सूट दिली जाते. अशाप्रकारे अनेकांनी टोल चोरी करण्यास सुरुवात केलीये. आतापर्यंत 12 हून अधिक आधारकार्ड काढून घेण्यात आलीत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!